विधिमंडळ सचिवालयच्या मते जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे गटनेते.

0
62
sharad pawar pressconference

मुंबई : राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांचीच अधिकृत गटनेते म्हणून नोंद असल्याची माहिती पुढे आली. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी सांगितले कि,  राष्ट्रवादी काँग्रेसने विधिमंडळ गटनेतेपदी निवडीचे पत्र सोमवारी दिले आहे. त्यानुसार जयंत पाटील गटनेते असतील. त्यामुळे त्यांनी  ज्याची प्रतोद म्हणून निवड केली असेल त्यांचाच “ व्हीप “ अधिकृत असतो.

भागवत म्हणाले कि , विधिमंडळाच्या गटनेत्यांची निवड पक्षाचा अध्यक्ष किंवा सरचिटणीस करतात. निवडीची माहिती ३० दिवसात विधानसभा अध्यक्ष  किंवा विधान भवनाच्या सचिवांकडे द्यावी लागते.शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचे पत्र दिले आहे. राज्यपाल  व विधिमंडळ या दोन  स्वतन्र घटनात्मक संस्था आहेत. दोन्ही ठिकाणी गटनेते  निवडल्याची माहिती घ्यावि लागते. राष्ट्रवादीने राज्यपालांकडे कोणतीही माहिती दिली  हे विधानाध्यक्षांना ठाऊक नसते . तसेच राष्ट्रवादीने अजित पवार याची निवड केल्याची माहिती अध्यक्षांना दिली नव्हती. म्हणून त्यांना विधिमंडळ  गटनेता समजत येणार नाही. आता जयंत पाटील यांच्या निवडीची माहिती दिल्यामुळे तेच पक्षाचे विधिमंडळ गटनेते असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here