कोल्हापूर विभागीय टेबले टेनिस

0
149
table tennis

 

इचलकरंजी इथे झालेल्या  कोल्हापूर विभागीय टेबले टेनिस स्पर्धेत  मुलांच्या तिन्ही गटात कोल्हापूर संघ अव्वल  ठरला.स्पर्धेतील विजयी संघाची रत्नागिरी येथील डेरवण इथं होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. इचलकरंजी इथं टेबले टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत. या स्पर्धेत सात संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचं उदघाटन इचलकंजी एजुकेक्शन  असोसिएशनचे प्रणव साठे याच्या हस्ते झालं .मुलांच्या चौदा वर्ष गटात कोल्हापूर लोहिया हायस्कूल कोल्हापूर आणि सातारच्या गुरुकुल स्कूल यामधील सामना कोल्हापूरच्या लोहिया हायस्कूलने झिकला. 

या गटात मालवणच्या रोजारी इंग्लिश स्कूलने  तिसरा क्रमाक पटकावला, सातारा वर्ष वयोगटातील मुलांचा सामना सेंग झेवियर्स हायस्कूल कोल्हापूर आणि डी सी नरके कुडित्रे यांच्यात झाला. त्यामध्ये सेंज झेविअर्स हायस्कूने विजय मिळवला, या गटात सातारच्या पोतदार इंटरनॅशन स्कूलने तिसरा क्रमांक पटकवला .एकोणीस वयोगटात कोल्हापूर गटात विवेकानंद कॉलेज व साताऱ्यातील न्यू इरा हायस्कूल यांच्यात  लक्षवेधी सामना झाला. या सामन्यात कोल्हापूर संघाने विजय मिळवला तर रत्नागिरीच्या अभ्यकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयान तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या संघाची डेरवण रत्नागिरी इथं होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here