चला घडवूया नवीन महाराष्ट्र

0
66
uddhav-thackeray

मुंबई : 

सध्याच्या राजकीय घडामोडी या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपेक्षा  कमी नाहीत असे ट्विट राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी या ट्विटमध्ये “चला घडवूया नवीन महाराष्ट्र “ असे देखील म्हणटले आहे. . 

आज सायंकाळी ६.४० वाजता शिवससेना प्रमुख उद्धव ठाकरे आज शिवतिर्थावर महाराष्ट्राच्या मुखयमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्याच्या सोबत महाविकास आघडीचे काही मंत्री पण शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या ; 

महाराष्ट्रातील राजकीय नाट्यमय राष्ट्रवादीचे नवाब मलिक , किंवा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप विरोधांत जोरदार फटकेबाजी केली. गेल्या महिनाभरात घडलेल्या सत्ता नाट्यांतर  आज महाराष्टात विकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. 

नवाब मलिक यांनी असे ट्विट केले आहे कि, सध्याच्या राजकीय घडामोडी या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी पेक्षा कमी नाहीत. चला घडवूया नवीन महाराष्ट्र. 

 तसेच सुप्रिया सुळे यांनी ‘ आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय ‘ असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘ हाऊ इज जोश ? म्हणत आजच्या शपथ सोहळ्यानिमित्त ट्विटवरून भावना व्यक्त केल्या आहेत. 

 देशातील मान्यवरांना शपथविधी सोहळ्याची निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच काँग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्री , समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग , अखिलेश सिंह यादव यांच्यसह विविध राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेत्याचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here