राज्यभरातून शैवसिनिक शिवतीर्थावर दाखल

0
69
Pune: Shiv Sena supporters celebrate after their party chief Uddhav Thackeray was designated as Maharashtra's chief minister, in Pune, Wednesday, Nov. 27, 2019. (PTI Photo) (PTI11_27_2019_000204B)
मुंबई: 
राज्यातील सर्व घडामोडीचे लाइव्ह अपडेट्स……
– राज्यभरातूनशैवसिनिक शिवतीर्थावर दाखल 
– बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी यांचे चांगले संबंध होते.इंदिरा गांधींना त्यांचा पाठिंबा होता – बाळासाहेब थोरात 
पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी काळ उद्धव ठाकरे याना स्वतः फोन करून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट राज्य नेण्यासाठी पूर्ण सहकार्य देऊ , असे मोदींनी आश्वासन दिले – संजय राऊत. 
– शिवसेनेसाठी ऐतिहासिक, आनंदाचा दिवस: संजय राऊत. 
– अजित पवार यांच्या बद्दल शरद -पवार निर्णय घेतील: संजय राऊत 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  बाळासाहेब थोरात यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह महसूल खात्याचा कारभार दिला जाण्याची शक्यता आहे. तर पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष होतील अशी शक्यता आहे. 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर सायंकाळी ५. ३० वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे आणखी काही मंत्री शपथ घेणार आहेत. 
स्वतः शिवसेना पक्षप्रमुख हेच मुख्यमंत्री होत असल्यामुळे शिवसेनेने हा शपथ विधी सोहळा अत्यंत प्रतिष्ठेचा केला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी , राहुल गांधी यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री , समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्यसह विविध राजकीय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या सोहळ्याला निमंत्रित केले आहे. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here