शिवशाही बस दरीत कोसळून दोन ठार

0
79
shivshahi

३२ जखमी : एक मृत डिग्रजचा : स्वारगेट सांगली बस: शिंदेवाडी घाटात अपघात 

 पुणे :  स्वारगेट ते सांगली प्रवासी घेऊन निघालेली शिवशाही बस कात्रजचा जुना बोगदा ओलांडून सुमारे ५० फूट अंतरावर एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून शिंदेवाडी घाटात ५० ते ६० फूट खाली कोसळली. हि घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ३२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अप्पासाहेब भाऊसाहेब देसाई [ वय ७५, रा. अकल्पित सोसायटी , बारामती], जगन्नाथ मारुती साळुंखे [ वय २८ , रा. डिग्रज, ता . मिरज , जी. सांगली.] अशी मृतांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , स्वारगेट ते सांगली प्रवासी बस दुपारी १ च्या सुमारास स्वारगेट स्थानकावरून सांगलीला निघाली होती. बस मध्ये ३४ प्रवासी होते. हि बस कात्रज ओलांडून शिंदेवाडी घाटात आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट घाटात ५० ते ६० फूट खाली कोसळली. कोसळताना ती सुमारे चार ते पाच वेळा उलटली. या घटनेत २ प्रवासी जागीच ठार झाले, तर सुमारे ३२ जण गंभीर जखमी झाले. या अपघातात बसचा चक्काचूर झाला. जखमींना रुग्णालयात  दाखल केले आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच काही वेळातच राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस, भरती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस तसेच बिट मार्शल पोहोचले. ठाणी इतर जखमींना रुग्णालयात पोहोचविले. 

 जखमींची नावे-      अभिदीप नंदकुमार धेंडे [ वय  ३२, रा. कुपवाड, सांगली. ] . [ प्रियांका अभय बुद्रुक २४ रा; शनिवार पेठ , मिरज]  सुनील लक्ष्मणराव धोंडे [ ५० , रा/ गारखेडा औरंगाबाद,] रवींद्र मोहन हातपके[ २६ , रा. सांगली], केदारसुभाष यादव [ रा. शिंदेमळा, सांगली,] प्रज्ञा प्रदीप माने[ ३० , रा कात्रज, पुणे] . प्राची वर्धमान निलाखे [ २२ रा. इस्लामपूर, सांगली] राहुल आदगोंडा पाटील[ ३२ रा. कवठे , सांगली] रोहित उत्तम भगत[ २४ , रा. मिरज] , बाळासाहेंबा कृष्णां गायकवाड [ ६३ , रा. सांगली] सुजित संजय बनसोडे[३१ , रा पुणे] तेजल विवेक सूर्यवंशी[ २० रा. अयोध्यानगरी, कऱ्ह्याड], वीरभद्र रंगराव सुतार[ ७८, परे सांगली] , स्वाती उमेश कांबळे[ ३० रा. मलकापूर कऱ्हाड ] .  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here