उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना केला फोन

0
61

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत . पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील सदस्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. मुंबईत शिवतीर्थावर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.  या शपथ विधीला संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र दिसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे याना शपथ विधीसाठी उपस्थित राहण्यासाठी फोन केला आहे असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. परंतु राज ठाकरे उपस्थित राहणार का नाही , याविषयी कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे दोन भावांमधील दुरावा कमी होईल अशी  चर्चा सगळीकडे रंगली आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी उद्धव ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे याना शपथ विधीसाठी निमंत्रण देण्यासाठी फोन केल्याची माहिती दिली आहे.  पण राज ठाकरे उपस्थित राहणार काय हे समजू शकलेले नाही. दोन भावांमध्ये राजकारणाच्या पलीकडचे नाते आहे. तसेच राज ठाकरे आपला मुलगा अमित ठाकरेंच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. अमितच्या लग्नात ठाकरे कुटुंबात फॅमिली बॉन्डिंग दिसले होते. तसेच ईडी च्या चौकशीच्या वेळी पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची बाजू घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे आज शपथविधीसाठी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार काय  ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here