“म्हणून “आमचंच पीक येणार असं कोणी आता म्हणू शकत नाही

0
97
udhav thackeray

“म्हणून “आमचंच पीक येणार असं कोणी आता म्हणू शकत नाही 

पुण्यात आज [ ता ; २५ ] वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटची ४३ वि वार्षिक सर्व साधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमावेळी चागलीच जुगलबंदी रंगली . मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याच्यावर चांगलीच स्तुतीसुमने उधळताना भाजपला टोचण्याचीही संधी नाही सोडली. 

 

तुम्ही [ शेतकरी] ज्याप्रमाणे कमी जागेत ज्यास्त पीक घेतलं , त्याप्रमाणे आम्ही शरद पवारासोबत कमीत कमी आमदारांमध्ये सरकार स्थापन करण्याचा चमत्कार करून दाखवला. जागा जास्त आहे म्हणून आमचंच पीक येणार असं कोणी आता म्हणू शकणार नाही. आम्ही ते कमी जागांमध्ये तुमच्यावर मत करू शकतो हे दाखवून दिल्याचे सांगत उद्धव ठाकरेनि पवारांची स्तुती , त्याचबरोबर फडणवीसांना चांगलाच टोल दिला. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले , सहकार आणि राजकारण वेगळं केलं जाऊ शकत नाही. कारण अनेक राजकीय नेत्यांनी सहकार क्षेत्र मजबूत केलं आहे. साखर कारखानदारी आणि साखर क्षेत्राने अनेक नेते दिले आहेत. आज ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात गोडवा वाटत असताना शेतकऱ्याच्या आयुष्यच चिपाड होत आहे. जर आम्ही राजकर्त्यांनी या कडे लक्ष दिल नाही तर या कार्यक्रमाला काहीच अर्थ नाही. 

आमचं सरकारच्या येताच महिनाभरात अनेक बैठका झाल्या . यातून आम्ही आता दोन लाख़ांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असल्याचा देखील विचार सरकार करीत असून जे नियमित कर्ज फेडतात, त्याच्यासाठी देखील योजना आणणार असल्याच आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.