आरेबाबा । ५,४५७ उंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून दीड कोटी रुपयांचा खर्च

0
102
ratkillmice

आरेबाबा । ५,४५७ उंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून दीड कोटी रुपयांचा खर्च 

मुंबई : मुंबईत उपनगरीय रेल्वेचे प्रचंड मोठे जाळे झाले आहे. असे असताना देखील सतत धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांच्या मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक पुरती कोलमडली जाऊ शकते. त्यामुळे सिंगल यंत्रणेत बिघाड टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नवं -नवीन उपाय योजना आखल्या जातात. यातच रेल्वे सध्या उंदराच्या उच्छादामुळे त्रस्त आहे. रेल्वे गाड्या, स्थानके , रेल्वेच्या कारशेडमध्ये उंदरांचा सूळसुळाट आहे. त्यामुळे रेल्वेचे दरवर्षी लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

जास्तकरून सिंग्नल वायर उंदीर कुडतरत [तोडत] असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला आला घालण्यासाठी आणि उंदरावर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातल्या गेल्या तीन वर्षात उंदरावर नियंत्रण मिळविण्यासाठी १ कोटी ५१ लाख रुपये खर्च करण्यात आले. परंतु इतका खर्च करूनही पश्चिम रेल्वेला फक्त ५४५७ उंदीर मारण्यात यश आले आहे. 

तीन वर्षांपासून पश्चिम रेल्वेने उंदरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी १, ५२, ४१, ६८९ रुपये खर्च केले आहे. जर प्रयेक दिवसाचा हिशोब केल्यास रोज सरासरी १४ हजार रुपये खर्च होत आहे. एवढे रुपये करून सुद्धा रोज सरासरी फाडत ५ उंदीर मारले जात आहेत. यासंबंधीची माहिती पश्चिम रेल्वे कडून आरटीआय अंतर्गत समोर आली आहे. यात पश्चिम रेल्वेने सांगितले आहे कि, रेल्वेचे डब्बे आणि यार्डात उंदरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काम करण्यात आले, हे काम करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

दरम्यान , कोटी रुपये खर्च करूनही उंदीर मारण्याचा हा प्रसन्न नाही तर खर्च झालेले रेल्वेचे नुकसान वाचविण्यासाठी होत आहे. जर उंदरावर नियंत्रण मिळवण्यासाठी खर्च केला नाही ते, प्रवाशांचे  साहित्य उंदीर खराब करतील. असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं. जर रेल्वेमध्ये खाण्या पिण्याच्या वस्तू टाकल्या नाहीत, साफ-सफाई असेल तर उंदरावर नियंत्रण मिळवणे सोपं होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितलं.