एयरटेलनंतर व्होडाफोनही नरमली : ग्राहकांना पुन्हा अनलिमिटेड कॉलिंगची भेट

0
67
airtel vodafone

एयरटेलनंतर व्होडाफोनही नरमली : ग्राहकांना पुन्हा अनलिमिटेड कॉलिंगची भेट 

जिओ , एअरटेल आणि व्होडाफोनमध्ये कॉलिंग आणि इंटरनेटवरुन शीतयुद्ध रंगले होते. कोणचा प्लान कमी किमतीत जास्त सेवा देणारा याबाबत गेल्या तीन वर्षांपासून रस्सीखेच सुरु होती. मात्र तोट्यात जात असल्याचे पाहून या कंपन्यांनी हे प्लॅन वाढविण्याचा निर्णय घेतला होता. 

 

नवी दिल्ली: अन्य नेटवर्क कॉलिंगकरण्यासाठी मिनिटाला ६ पैसे एफयुपी द्यावा लागत असल्याने हा पैसे ग्राहकांच्या खिशातून काढण्याचा निर्णय टेलिकॉम कंपन्या च्याच अंगलट येऊ लागला आहे. यामुळे टेरिफ वाढवण्यासाठी कंपन्यांनी ग्राहक टिकवण्यासाठी पुन्हा अनलिमिटेड कॉलिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. व्होडाफोन – आयडियाने हि माहिती दिली . 

 

त्याआधी एअरटेल एफयुपी हटवण्याची घोषणा केली होती. जिओ , एरटेल आणि व्होडाफोन मध्ये कॉलिंग आणि इंटरनेट वरून शीतयुद्ध रंगले होते. कोणाचा प्लान कमी किमतीत जास्त सेवा देणारा याबाबत गेल्या तीन वर्षांपासूनरस्सीखेच सुरु होती. मात्र तोट्यात जात असल्याचे पाहून या कंपन्यांनी हे प्लॅन वाढविण्याचा निर्णय घेतला . 

 

जिओ अन्य नेटवर्क वर कॉल करताना रिंग वाजण्याचा कालावधी कमी करत असल्याचा आरोप एअरटेल , व्होडाफोन यांनी केला होता . तर जिओन आंतरराष्ट्रीय नियमानुसार असल्याचे म्हंटले होते. असे केल्याने अन्य नेटवर्कच्या ग्राहकांना मिस्डकॅल जात होता. यामुळे त्या ग्राहकांनी जिओला फोन केल्याने या  कंपन्यांना जिओला ६ पैसे एफयुपी द्यावी लागत होती. 

 

या वादामुळे कंपन्यांनी रिचार्जची रक्कम वाढविण्याबरोबरच अन्य नेटवर्कसाठी लिमिटही दिले होते. व्होडाफोनने २८ दिवसाच्या रिचार्जसाठी १००० मिनिट दिले होते. तर ८४ दिवसांच्या रिचार्जसाठी ३००० मिनिटे देण्यात आली होती. जर २८ दिवसाचा ग्राहक रोज अन्य नेटवर्कवर एक तास बोल्ट असेल तर त्याची हि लिमिट १६ दिवसात संपणार होती. असे झाले असते तर हे प्लान्स महागडे ठरत होते. यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी होती. तुलनेत जिओचे प्लॅन स्वस्त होते, यामुळे आधीच ग्राहक गमावलेल्या कंपन्यांना हे परवडणारे नव्हते . 

 

आणि  याचमुळे एअरटेल नंतर व्होडाफोनही अनलिमिटेड कॉल देण्याची घोषणा केली आहे.