आज शेतकऱ्यांबाबत होणार मोठा : अजित पवार

0
71
ajit pawar

आज शेतकऱ्यांबाबत होणार मोठा निर्णय : अजित पवार 

नवं वर्ष होण्याआधीच ३१ डिसेंबरपूर्वी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी दिले आहेत. पक्षाची नेते आणि पक्ष जी जबाबदारी देईल, ती जबाबदारी पार पडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

आज विधानसभेत शेतकऱ्यांच्या संदर्भात चांगला निर्णय पहावयास, ऐकायला मिळेल. कर्जमाफीबाबत सकारात्मक निर्णय होईल, असेही ते म्हणाले. 

राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने [ एसीबी ] सिंचन घोटाळ्यात अजित पवार याना पूर्णतः क्लिन चिट दिली आहे. याबाबत विचारले असताना अजित पवार यांनी नो कमेंटस म्हणत बोलणे टाळले . मला या विषयावर काहीच बोलायचे नाही . आज अधिवेशनात शेवटचा दिवस आहे, असे त्यांनी नमूद केले. 

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले कि, महाराष्टातील आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने विरोध करावा. नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरून कोणी राजकीय पोळी भाजून घेऊ नये, असे वक्तव्य त्यांनी केले. 

दरम्यान , आज हिवाळी अधिवेशनचा शेवटचा दिवस आहे. आज शेतकरी कर्जमाफीच्यासंदर्भात महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.