अजितदादा अजूनही शांत नाहीत “ भाजप नेत्याचे सूचक विधान “

0
57

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री अजित पवार हे त्याच्या पक्षात अस्वस्थ होते. त्यामुळे ते भाजपकडे आले. म्हणून सत्ता स्थापन केली, पण त्यांची अस्वस्थता कायम राहिली . त्यांनी पुन्हा परत जाण्याचा निर्णय घेतला असला तरी अजूनही शांत नाहीत, असे विधान भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. 

कऱ्हाड येथे पत्रकारांशी संवाद साधताना भंडारी बोलत होते. यावेळी कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहीने शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी,मुकुंद चरेगावकर आदी उपस्थित होते. 

पत्रकारांनी  विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना माधव भंडारी म्हणाले, ‘ अजित पवारांना ‘ आम्ही कोणताही शब्द दिला नव्हता. तेच आमच्याकडे आले होते. आणि अजितदादांना आम्ही जेवढे ओळखतो त्यावरून ते बोलतात एक आणि करतात दुसरे, असा त्याचा स्वभाव नाही. त्यामुळे त्यांनी जे निर्णय घेतले, त्याबाबत अजितदादाच चांगले उत्तर देऊ शकतात. असेही माधव भंडारी यांनी सांगितले.