अजित पवार -देवेंद्र फडणवीस पुन्हा आले एकत्र, चर्चाना उधाण : पण

0
65
ajit phadnvis

अजित पवार -देवेंद्र फडणवीस पुन्हा आले एकत्र, चर्चाना उधाण : पण …… 

मुंबई : राज्यातील सत्ता नाट्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा एकत्र आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या संजय शिंदे यांच्या मुलाचे लग्न काळ माढ्यात पार पडले . या निमित्याने अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. यावेळी या दोघांनी जवळपास २० मिनिटे गप्पा मारल्या. त्यामुळे त्याच्या या भेटी मुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण , अजित पवार भेटी दरम्यान दोघामंध्ये काय चर्चा झाली, याबाबत खुलासा केला आहे. 

या भेटीसंर्भात मीडियाशी बोलताना अजित पवार म्हणाले कि. “ संजयमामा शिंदेच्या मुलाच्या लग्नात फडणवीस आणि माझी खुर्ची शेजारी शेजारी होती. यावेळी आमच्यात हवा पाण्याबद्दल गप्पा झाल्या. “तसेच महाआघाडी सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री व्हावे, असे कार्यकर्त्यांना वाटते. पण ते ठरवण्याचा निर्णय त्या – त्या पक्षप्रमुखांचा आहे. शिवाय, खातेवाटपाचा अधिकारी मुख्यमंत्री आहे. “ 

दरम्यान , राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा सुरु असतानाच , २३ नोव्हेंबर रोजी भाजपला पाठिंबा देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारांनी वैयक्तिक निर्णय घेतला असल्याचे सांगत राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. तसेच , दोन दिवस अजित पवारांच्या मनधारणीचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीमाना दिला. त्यामुळे भाजपाकडे बहुमत नसल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे ८० तासात सरकार कोसळले , त्यानंतर काळ सोलापूरमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली.