डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार ?

0
73
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवास्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार. ?
मुंबई :  डॉ . बाबासाहेब आंबेडकर याचा ६३ व महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परळ येथील बीआयटी चाळीत आले होते. परळ दामोदर हॉलजवळीत बीआयटी चाल येथील इमारतीत दुसऱ्या माळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहत होते. १९१२ ते १९३४ या कालावधीत २२ वर्ष त्याचे वास्तव्य होते. हे निवास्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची मुख्यमंत्री ठाकरे यांनी घोषणा केली आहे. 
गुरुवारी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना भेटून हि मागणी केली होते. आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण वर्षे ज्याचाळीमध्ये डॉ. आंबेडकरांनी घालवली . तिथून जिथे त्यांनी मनुस्मुर्ती जाळण्याचा निर्णय घेतला, जिथून ते वर्ल्ड टेबल कॉन्फरन्सला [ गोलमेज परिषदेला ] गेले . जिथे त्यांना छत्रपती शाहू महाराज भेटले ल.ल त्या खोलीचे व त्या इमारतीचे राष्ट्रीय स्मारक करावे अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.  
दरम्यान, डॉ.बाबासाहेबआंबेडकरयांच्यामहापरिनिर्वाणदिनानिमित्त्यभगतसिंगकोश्यारी, मुख्यमंत्रीउद्धवठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले , मंत्री जयंत पाटील यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या स्मुर्तीस अभिवादन केले . त्यावेळी मुंबईच्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी त्यांचे अनुयायी चैत्यभूमी, दादर परिसरात मोठ्या प्रमाणात येतात . 
त्यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मुतीस अभिवादन करताना दिलेल्या संदेशात ठाकरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेविरुद्ध लढा पुकारला, त्यांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. माणूस मानून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. इंदू मिल येथील नियोजित स्मारक त्यांच्या विचाराचा प्रसार व प्रचार करणारे प्रेरणास्थान ठरेल. अन्यायग्रस्त , वंचित , आयुष्याची लढाई हरलेल्या माणसाला विषमतेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तसेच जिंकण्याची प्रेरणा या स्मारकातून मिळेल. असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी  व्यक्त केला हे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. बाबासाहेबानी दिलेला समतेचा , न्याय आणि बंधुतेच्या विचारांच्या दिशेने शासनाची वाटचाल राहील. इंदू मिल येथील स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यात येईल.ल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.  

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here