दिल्लीत अग्नितांडव सुरूच : अनाज मंडित दुसऱ्या दिवशी आग

0
64
major_delhi_fire_incidents_1575781673

दिल्लीत अग्नितांडव सुरूच : अनाज मंडित  दुसऱ्या दिवशी आग 

नवी दिल्ली : 

राजधानी दिल्लीत अग्नितांडव सुरूच आहे. काळ अनाज मंडी परिसरात लागलेल्या आगीत आगीत ४३ जणांचा होपळुन मृत्यू झाला होता. यामुळे घटनास्थळी अग्निशामक चार गाड्या दाखल झाल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. 

राजधानी दिल्लीतील झाशी रोड वरील अनाज  मंडी परिसरातील घरांना काळ पहाटेच्या सुमारास आग लागली होती. या आगीत ४३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. 

रविवारची सकाळ दिल्लीतील फिल्मीस्तान परिसरातील धान्य बाजार गल्लीसाठी काळ होऊनच उगवली . गल्लीतील एका चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४३ जणांचा भाजून मृत्यू झाला होता. 

इमारतीतील चारही मजल्यावर प्लास्टिक पिशव्या आणि पॅकेजिंग अनेक लहान सहान अवैध कारखाने चालतात. बहुतांशी मजूर रात्री इथेच झोपतात. अचानक आग लागली. प्लास्टिकमुळे काही सेकंदात आग भडकली. बघता बघता आगीने अवधी इमारत आपल्या कवेत घेतली. आग लागली तेव्हा इमारतीत शंभरवर लोक होते. निम्मे अधिक गाढ झोपेत होते. आगीच्या कल्लोळांनी त्यांना  झोपेतच कवटाळले.ल 

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले हात असले, तरी नेमके कारण जाणून घेण्यासाठी आणि त्या अनुषंगाने भविष्यकालीन उपाययोजनांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. 

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या ३० गाड्या सारख्या राबल्या. आगीतील जखमींची संख्याही मोठी आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण, हिंदुराव , राममनोहर लोहिया, लेडी हँडींग रुग्णालयातून जखमींना दाखल करण्यात आलेले आहे. पैकी, १५ जनाची प्रकृती अत्यवस्थ आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. 

  • कुटूंबियांना,जखमींना मदत 

 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थिती पाहणी केली. आगीच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश केजरीवाल यांनी दिले आहेत. मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये,       तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये दिल्ली सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आहेत. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्चही दिल्ली सरकारकडून केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्चही दिल्ली सरकारकडून केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहाय्यता  निधीतून मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. 

काँग्रेसच्या हंगामी सोनिया गांधी ,महासचिव ,प्रियांका गांधी ,माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून घटनेबद्दल दुःख व्यक्त केलेले आहे. स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मदतकार्यात योगदान द्यावे असे आवाहन या नेत्यांनी केले आहे.