आनंद महिंद्रा मार्चमध्ये पद सोडणार

0
78
anand_mahindra_two_wheelers_660_121219123331_201219022257

आनंद महिंद्रा मार्चमध्ये पद सोडणार

नवी दिल्ली : महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा आता १ एप्रिल २०२० पासून अकार्यकारी अध्यक्ष म्हणून काम बघणार आहेत. महिंद्रा अँड महिंद्राने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार , पवन कुमार गोयंका याना व्यवस्थापकीय संचालक [ एमडी ] व मुख्य कार्यकारी अधिकारी [ सीईओ ] म्हणून पदोन्नती देण्यात येणार आहे. सध्या त्याचा कार्यकाळ ११ नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे. त्यानंतर गोयंका याची पुन्हा नियुक्ती करण्यात येणार असून ते पुन्हा १२ नोव्हेंबरला २०२० ते १ एप्रिल २०२१ पर्यंत पदावर कायम राहतील 

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार , येत्या १५ दिवसात बरेच वरिष्ठ अधिकारी निवृत्त होणार आहेत. यामुळे सध्या कंपनीमध्ये ‘ रिस्ट्रक्चरिंग काम सुरु आहे. तसेच आनंद महिंद्रा अकार्यकारी अध्यक्ष म्हणून कंपनीच्या संचालक मंडळावर मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडणार आहेत. 

समूहाचे धोरणात्मक अध्यक्ष असलेले अनिष शाह १ एप्रिल २०२० पासून मुख्य वित्त अधिकारी [ सीएफओ ]काम बघणार आहेत.