अटळ भूजल योजना काय आहे

0
102
atal-bhujal-yojana

 

नवी दिल्ली : अटळ भूजल योजनेला १२ डिसेंबर वर्ल्ड बँकेकडुन मंजूरी मिळाली आहे. ६ हजार कोटीचे – बाजारत असणाऱ्या या योजनेत ५० % भागीदारी भारत सरकारची असणार आहे. आणि अर्धा खर्च वर्ल्ड बँकेकडुन खर्च केला जाणार आहे. पीएम नरेंद्र मोदी अटल बिहारी बाजपेयी यांच्या ९५ जयंतीचे औचित्य साधून दिल्लीमध्ये अटल भूजल योजनेची सुरुवात केली. या भूजल योजनेद्वारे प्रत्येक घरात पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचविले जाणार आहे. मंगळवारी, पीएम मोदी यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या कॅबिनेट मिटींग मध्ये मंजूरी देण्यात आली होती. अटल भूजल योजना कुठे आणि कशी लागू होणार जाणून घेऊया. 

 

  • हि योजना पाणी संकट ग्रस्त उत्तर प्रदेश , गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश , राज्यस्थान महाराष्ट्रात  या राज्यात लागू करण्यात येईल. या राज्याची निवड भूजलाचा अभाव , प्रदूषण आणि अन्य मानके लक्षात घेऊन करण्यात आली आहे. 
  • सरकरचा दावा आहे कि, या योजनेमुळे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल. या योजनेमुळे ८, ३५० गावांना लाभ मिळेल. सरकारच्या माहितीनुसार, पाण्याची समस्या सोडवण्यासाठी अटल भूजल योजनेवर ५ वर्षांमध्ये ६ हजार कोटी रुपये खर्च होतील.
  •  
  • ग्राम पंचायत पातळीवर पाणी संरक्षणाचे काम केले जाईल, भूजल संरक्षणासाठी शैक्षणिक संवाद कार्यक्रम आयोजित केले जातील.
  • या योजनेत सामान्य लोकांना सहभागी करून घेतले जाणार आहे.