झारखंडची सत्ताही भाजप गमावणार

0
79
bjp

झारखंडची सत्ताही भाजप गमावणार ? 

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी पूर्ण झाले . ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत मतदान झाले. शुक्रवारी सायंकाळी आलेल्या एक्झिट पोल नुसार राज्यात भाजपला सत्ता गमवावी लागणार असून काँग्रेस – झारखंड मुक्ती मोर्चा याचे सरकार सत्तेवर येऊ शकते. 

 

झारखंड विधानसभेच्या निकाल २३ डिसेंबरला येणार आहे. सध्या तिथे भाजप आघाडीचे सरकार आहे. ८१ जगाच्या विधानसभेत बहुमतासाठी ४१ जागा आवश्यक आहेत. आज तर्क – एक्सिम माय पोल नुसार भाजपला २२ ते ३२ जागा मिळण्याची शक्यता असून काँग्रेस – झामुमोला- राजदला ३८ ते ५० जागा मिळतील. आयएएनएस – सोवोटर – एबीपीच्या एक्झिट पोल नुसार भाजपला ३५ – झामुमो – राजदला ३७ जागा मिळू शकतील. गेल्या निवडणुकीत भाजपला ३७ आणि आजसूला ५ जागा मिळाल्या होत्या.