भाजपला आत्मचिंतनची गरज : संजय राऊत

0
72
sanjay raut

भाजपला आत्मचिंतनची गरज : संजय राऊत 

झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरु झाली आहे. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार असेल तरीही सुरुवातीच्या कालावरून भाजप पिछडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या वर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला आता आत्म चिंतनाची गरज असल्याचे म्हटले आहे. 

राज्यातील ८१ जागांसाठीच्या प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा – काँग्रेस- राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला. एकूण पाच टप्यात मतदान झाले. मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपला धक्का बसेल असा अंदाज वर्तवण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्यात सत्तेवर असणाऱ्या महाविकास आघाडीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असे पाहायला मिळत आहे. 

झारखंड भाजपच्या परिस्थितीवर बोलताना संजय राऊत यांनी भाजपचे महाराष्टनंतर नंतर झारखंड मध्ये हि स्थान गमावले असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी आणि  गृहमंत्री अमित शाह यांनी लावलेली ताकद फुकट गेली असल्याचे टोला हाणला आहे. 

झारखंडचा निकाल अपेक्षित होता. महाराष्ट्रा सोबत झारखंड मध्ये हि गमवावे लागल्याने भाजपला आत्मचिंतनची गरज आहे. त्यामुळे त्यानी आता आत्मचिंतन करावे , असा टोला  संजय राऊत यांनी दिला .