औरंगाबाद : आयुक्तांकडून भाजपच्या नगरसेविकेला पाचशे रुपयांचा दंड

0
97
plastic

 औरंगाबाद : आयुक्तांकडून भाजपच्या नगरसेविकेला पाचशे रुपयांचा दंड 

औरंगाबाद : 

नवे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी स्वागतासाठी प्लास्टिकयुक्त बुके आणल्याने अहमदनगर रचना सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन याना पाच हजार रुपयांचा दंड ठोकला होता. त्यापाठोपाठ पांडेय यांनी आज मंगळवारी भाजपच्या नगरसेविकेला दंडाचा दणका दिला. भाजपच्या नगरसेविका मनीषा मुंडे यांनी आयुक्तांना पाचशे रुपयांच्या दंडाची पावती दिली. 

आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी मनपा आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारत त्यांनी प्लॅस्टिक बंदीची मोहीम प्रकर्षाने राबविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच स्वागतासाठी प्लॅस्टिक युक्त पुष्पगुच्छ घेऊन आलेल्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक आर. एस. महाजन याना पाच हजार रुपयांचा दंड ठोकला होता. त्यानंतर आज भाजपचे गटनेते प्रमोद राठोड याच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शिष्टमंडळ आयुक्तांच्या भेटीला आले. यावेळी राठोड यांनी आयुक्तांना ‘ जायकवाडीचे  पाणी ‘ हे पुस्तक भेट दिले. त्यानंतर नगरसेविका मनीषा मुंडे यांनी आयुक्तांना पेन भेट दिला. पण पेन गिफ्ट पेपरमध्ये गुंडाळलेला होता. त्यामुळे आयुक्तांना प्लास्टहीक वापराबद्दल पाचशे रुपये दंडाची पावती दिली . या प्रकरणी नगरसेवक अचंबित झाले. 

आयुक्तांचा सन्मान ठेवण्यासाठी दंड भरला. 

शहरात सर्वच दुकानात गिफ्ट पेपरचा वापर होत असल्याने त्या ठिकाणी मनपाचे कधी कारवाई केली नाही. आयुक्तांनी दंडाची सूचना केल्यानंतर आम्ही घनकचरा विभाग प्रमुख नंदकुमार भोंबे यांच्याकडे विचारणा केली . त्यावर त्यांनीही गिफ्ट पेपर बंदी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तुंमध्ये येत नाही, असे सांगितले . तरीही आम्ही आयुक्तांचा सन्मान ठेवायचा म्हणून पाचशे रुपयांचा दंड भरला .