Box office collection : भाईजानची जादू ओसरली अन …

0
86

भाईजान सलमान खानचा ‘ दबंग ३’ हा सिनेमा २० डिसेंबरला रिलीज झाला आणि संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. भाईजानच्या चाहत्यांनी या सिनेमाची भरभरून प्रसंशा केली . पण  काही जणांनी हा सिनेमा पाहिल्यानंतर ‘ भाई कब तक ? असा सवाल केला. चांगले चित्रपट बनव . नाहीतर संन्यास घे ‘ अश्या शब्दात काहींनी सलमान खानला सुनावले. अर्थात याउपरी डाय हार्ट चाहत्यांच्या जोरावर रिलीज नंतर तीन दिवस सलमानची जादू चालली पण चौथ्या दिवशी मात्र, ‘ दबंग ३ ‘ कमाईचा ग्राफ खाली सरकत आला. 

पहिल्या दिवशी २४. ५० कोटी कमाई करणाऱ्या या सिनेमाने काल सोमवारी केवळ १०. ७०कोटी रुपयांची कमाई करत मेकर्सची निराशा केली. 

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २४ ५० कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी २४. ७५ कोटी रुपयांची कमाई केली. आणि रविवारी तिसऱ्या दिवशी ३१. ९० कोटी कमावले. पण सोमवारी मात्र केवळ १०. ७० कोटी रुपयाची कमाई केली. चित्रपटाची एकूण कमाई कोटी असली तरी चित्रपटाची क्रेज कमी झाल्याचे यावरून दिसते.

 

पहिल्या दिवशी या चित्रपटाने २४. ५० कोटीची कमाई केल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक युजर्सनी हा आकडा खोटा असल्याचा आरोप केला होता. कमाल आर खान याने सर्वप्रथम या आकड्यांवर आक्षेप घेतला होता . ‘ हे फेक कलेक्शन आहे. माझ्या कडे फक्त दोनच शब्द आहेत. , आ ….. थू …. हे फक्त कलेक्शनहि चित्रपट फ्लॉप होण्या पासून वाचवू शकत नाहीत, असे कमाल आर खान यांनी म्हटले होते. त्यानंतर अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया देणे सुरु केले होते.