‘बुलेट ट्रेन मोदींची प्राथमिकता असू शकेल, देशाची नाही

0
58
बुलेट ट्रेनचा १० हजार ते ११००० हजार रुपयांचा भाडे भरून कोण करणार आहेत.
मुंबई : 
महावीकास आघाडीचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला बुलेट ट्रेनला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर याच मुद्यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. बुलेट ट्रेन हि मोदींची प्राथमिकता असू शकेल देशाची नाही, असा टोला त्यांनी मोदींना लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड कामाला स्थगिती दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने आधीपासूनच या प्रकल्पाला विरोध केला होता. आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सुद्धा याच मुद्यावर बोट ठेवत मोदींवर निशाणा साधला.
देशातील हवाई उद्योग  अजूनही हवे तसे विकसित झाले नाहीत. अनेक विमान कंपन्यांना ह्या नुकसानीत चालत आहे. तर मुंबई – अहमदाबादचा विचार केला तर तीन हजारपेक्षा अधिक भाडे नाहीत . त्यामुळे बुलेट ट्रेनचा १० ते ११ हजार रुपयांचं भाडे भरून कोण प्रवास करणार आहेत. तसेच बुलेट ट्रेनमधून नफा मिळवण्यासाठी किती फेऱ्या  लावावा लागतील, याचे सुद्धा नियोजन करावे लागणार आहे. मात्र याचा कोणताही विचार मोदींनी केला नसल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. 
त्यांचा हा निर्णय फक्त गुजरातला मुंबईशी जोडण्यासाठी आहे. मुंबईमधील व्यापारी आणि उद्योगधंदे गुजरातकडे आकर्षित व्हावे या दृष्टीकोनातून त्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे हा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता असून ,बुलेट ट्रेन हि मोदींची प्राथमिकता असू शकेल देशाची नाही. असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here