बुमराह साठी काय पण

0
79
Jasprit-Bumrah-4

केरळ आणि गुजरात यांच्यात गुरुवारी सुरु होणाऱ्या रणजी करंडक सामन्याआधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यातून पुनरागमन करू शकतो अशी चर्चा होती. पण सुरतच्या लालभाई कंत्राटदार स्टेडियमवर गुरुवारपासून सुरु होत असलेल्या एलिट ग्रुप ‘ अ ‘  सामन्यात बुमराह खेळणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली [ दादा ] यांनी बुमराहला रणजी ट्रॉफीमध्ये न खेळण्याची परवानगी दिली आहे. 

 

दरम्यात सौरव गांगुली यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून बुमराहला ब्रेक चालू ठेवण्याची परवानगी दिली. बुमराह टाटा थेट श्रीलनकेविरुद्ध ती – २० आंतरराष्टीय सामन्यात खेळेल. सर्व गोष्टी लक्षात घेऊन ‘ गांगुली आणि भारतीय संघ व्यवस्थापक तसेच कर्णधार विराट कोहली याबाबतीत एकमत आहेत. 

 

तीन महिन्याच्या विश्रांतीनंतर स्पर्धकात्मक क्रिकेटमध्ये परतलेल्या बुमराहला केरळ विरुद्ध एलिट ग्रुप ए सामन्यासाठी सुरत गाठायला सागितलले. याच वेळी, सामना खेळात बुमराहला ‘ काही हरकत नव्हती . पुनरागमन त्रासदायक आणि घाईघाईने होऊ नये असा तो खाजगीत विचार करत होता. २०२० जानेवारी पासून सुरु होणाऱ्या क्रिकेट हंगामासाठी तयारी करणे हे बुमराहचे लक्ष आहे.

 

बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा या दोघांनी बुमराहला व्हाईट बॉल क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे . गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलने बुमराह सुरतच्या सामन्यात खेळणार नसल्याचे सांगितले. 

 

राष्ट्रीय निवड समितीने गुजरात संघ व्यवस्थापनाला सल्ला दिला होता कि, बुमराह जर दुखापतीतून सावरत असल्याने दिवसाला किमान आठ षटके गोलंदाजीची परवानगी द्यावी. पण गुजरात टीम मॅनेजमेंट यातून थोडे अस्वस्थ दिसून आले. एका दिवसात जास्तीत जास्त आठ षटके गोलंदाजी करणाऱ्या संघात एखाद्या गोलंदाजाला संधी देणे आपले लक्ष पूर्ण करीत नाही.