#CAA : फरहान अख्तरच्या ट्विट आयपीएस डी . रूपा यांची खोचक टिप्पणी

0
93
farhanakhtar

#CAA : फरहान अख्तरच्या ट्विट आयपीएस डी . रूपा यांची खोचक टिप्पणी

 

बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरने नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या विध्यार्थाचे समर्थन केले आहे. त्याचा आंदोलनादरम्यानचा एक व्हिडीओ ट्विटवर वायरल झाला आहे. या व्हिडिओवर लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकातील आयपीएस अधिकारी डी रूपा यांनी आपले मत मांडले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये फरहान म्हणतो “ तुम्ही खोल विचार केला तर तुम्हाला समजेल कि,काही न काही तर यामध्ये होत आहे. जर सर्व काही ठीक असत तर इतके सारे लोक चिंतेत का असते. “

 

फरहान हा व्हायरल व्हिडिओ रिट्विट करत आयपीएस रूप म्हणतात, “ जर फरहान अख्तर यासारख्या सेलेब्रेटींचे  आहे तर मला आश्चर्य वाटते कि, किती आंदोलनकर्त्यांना वास्तव माहित असेल कि CAA काय आहे? किती विध्यार्थी असे असतील कि या आंदोलनात सहभागी होत आहेत. अशी किती माणसे असतील, जी आंदोलनकर्त्याच्या मानसिकतेमुळे या आंदोलनात सहभागी होत आहेत. “ 

 

रूपा यापुढे म्हणतात “ अपूर्ण माहिती असताना अफवा पसरणे आणि विना माहीती काहीही करणे “

व्हायरल व्हिडीओ मध्ये एक मीडिया रिपोर्टर फरहानला विचारतोकि सरकार आश्वासन देत आहे कि या कायद्यामुळे कोणतीही समस्या होणार नाही.यावर फरहान म्हणतो, मग  , सर, आपण घरी जा, आपण येथे येऊन आंदोलन कव्हरेज का करत आहात ? 

 

 याआधी फरहानने एक ट्विट करून CAA  चा विरोध केला होता. नागरिकत्व कायद्यविरोधात ट्विट करणं अभिनेता फरहान अख्तरला भारी पडलं आहे. तेलंगणामध्ये त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे . नागरिकत्व कायदा विषयी चुकीची माहिती ट्विटरवर दिल्याबद्दल आणि लोकांमध्ये भीती पसरवल्याचा फरहानवर आरोप आहे.