गुगल सर्चमधून CAA , NRC गायब

0
106

मुंबई: गेल्या काही दिवसापासून नागरिकांत सुधारणा कायदा आणि एनआरसीवरून देशभरात हिंसाचार उफाळलेला होता. केंद्र सरकारने केलेल्या या कायद्या वरून गुगल वर मोठ्या प्रमाणात सर्चिंग केले जात होते. यामुळे सीएए आणि एनआरसी हे विषय लोकांच्या कुतूहलाचे बनले, मात्र काल हे दोन्ही वादग्रस्त ठरलेले विषय अचानक पाने गुगल सर्चिंग मधून गायब झाले. 

काल झारखंडच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल होता. दोन दिवसापूर्वीच एक्झिट पोल द्वारे तेथे भाजपाची हार होणार असल्याचे सांगीतले गेले होते. यामुळे साऱ्या देशाचे लक्ष झारखंडमध्ये लागले होते. विशेष म्हणजे २०१४ मध्ये भाजपने झारखंडची निवडणूक जिंकून विजयाचे शिकार चढायला सुरुवात केली होती. काल राज्यात भाजपला पराभव पत्करावा लागला. निवडणुकीचा काळ एवढा गाजला नव्हता, मात्र या राज्यात मोदी  व अमित शहानी सभा घेतल्या होत्या. 

काँग्रेस कडून काहीसा उत्साह मावलेलाच दिसत होता. शेवटच्या दोन टप्प्यात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी प्रचार केला होता. सोनिया गांधी तर फिरकल्याही नव्हत्या. मात्र, भाजपबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी आणि कदाचित एनआरसी , सीएए चा वाद यामुळे भाजपला पराभव पहावा लागला. आणि याचमुळे कालचा दिवस झारखंड निकालाने गाजवला. 

गुगल ट्रेडच्या डेली सर्च सेक्सशनमध्ये झारखंड इलेक्शन रिझल्ट आजही नंबर एक वर आहे. तर गूगलवर कालच्या दिवसभरत झारखंड निवणुकीशी संबंधित २० लाखाहून अधिक वेळा सर्च करण्यात आले आहे. यानंतर युजर शेतकरी दिन आणि भाजप सर्च करत होते. 

तर झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास आणि होणारे मुख्यमंत्री हेमंत सोरेन याना सारखेच सर्च करण्यात येत होते. या दोघांनाही गुगल ट्रेंडवर १९ रँक मिळाले होते. तर सीएए , एनआरसी बाबत युजर्सनी सोमवारपासून सर्च न केल्याने जवळपास ट्रेडमधून गायबच झाले होते. 

  • सर्वाधिक सर्च केले जाणारे कीवर्ड 
  • Jharkhand Election 
  • Election  results jharkhand 
  • Jharkhand 
  • JMM 
  • Jharkhand News 
  • Election Results 
  • Jharkhand result