CAA आणि NRC विषयाची भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी मोदी सरकारने जारी केले FAQ

0
79
caaandnrc

CAA आणि NRC विषयाची भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी मोदी सरकारने जारी केले FAQ

सुधारित नागरिकत्व होत असताना या कायद्याविषयी होत असताना या कायद्याविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात असल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली  शंका दूर करण्यासाठी काही प्रश्नोत्तरे प्रसिद्ध केली आहेत. या FAQFrequently Asked Questions मध्ये CAA आणि NRC बद्दल नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी म्हणून संपूर्ण प्रक्रिये विषयीची माहिती देण्यात आली आहे. 

केंद्र सरकारने चा म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी गैरसमज दूर करण्यासाठी FAQ नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न जरी केले आहेत. 

 • CAA आणि NRC बद्दल भारतीय मुस्लिमांनी  बाळगायची कारण आहे का? 

नाही . NRC चा धर्माशी संबंध नाही. जेव्हा राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी किंवा NRC प्रक्रिया सुरु होईल तेव्हा धर्माच्या आधारावर नोंदणी होणार नाही. 

 • नागरिकत्व कसे ठरवलं जात? नागरिकत्व ठरवणं सरकारच्या हाती असत का ? 

 TTHE Citizenship Act , १९५५, नुसार Citizenship Rules , २००९ प्रमाणे नागरिकत्व ठरवलं जात. या कायद्याच्या सर्व तरतुदीची माहिती सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली आहे. भारताचं नागरिकत्व मिळवण्याचे ५ मार्ग आहेत. 

 • १ ] जन्माने मिळालेलं नागरिकत्व 
 • २] वारशाने किंवा वंशामुळे मिळालेलं नागरिकत्व 
 • ३] नागरिकत्व मिळवण्यासाठी कायद्याच्या चौकटीत केलेल्या अर्जाद्वारे 
 • ४] कायद्याने ठरवलेल्या ठराविक अटींची पूर्तता केल्यानंतर 
 • ५] एखाद्या भूभागाला देशाला जोडला गेला, तर आपोआप तिथल्या नागरिकांना भारताचं नागरिकत्व मिळेल 
 • NRC आल्यावर पालकांना जन्माच्या दाखला वगैरे कागद्पत्रक सादर करावी लागतील का? 

तुमच्या जन्माचे वर्ष , महिना , ठिकाणी आदी माहिती पुरेशी आहे. त्याचे पुरावे उपलब्ध नसतील तर पालकांच्या जन्माचे दाखले द्यावे लागतील. पण पालकांचे जन्म दाखले देण्याचा कोणताही नियम बंधनकारक नाही. कुठली कागदपत्र द्यायची याबाबत अद्याप कोणतीच घोषणा किंवा ठराव झालेला नाही. पण निवडणूक ओळखपत्र, आधार , पासपोर्ट, लायसन्स, विम्याचे कागद, जन्म दाखल , शाळा सोडल्याचा दाखला, घर किंवा मालमतेची कागदपत्र यातला कुठलाही पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकतो. या कागदपत्रांची यादी मोठी असेल आणि कुठलाही भारतीय नागरिकाला कागदपत्रांसाठी वेठीस धरण्यात येणार नाही. 

 • NRC आलं तर १९७१ च्या आधीच रहिवाशी पुरावा द्यावा लागेल का ? 

तुमचे पूर्वज इथले नागरिक होते हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्र द्यायची आवश्यकता नाही. १९७१ च्या आधीच्या त्याच्या जन्मदाखल्याची आवश्यकता नाही  . आसामच्या NRC साठीच केवळ तसा नियम होता आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून तो ठेवण्यात आला होता. बाकी देशातील NRC प्रक्रिया आसामपेक्षा वेगळी असेल The Citizenship ] Registration of citizens and issue Of National Identity cards ] Rules , २००३ या कायद्याअंतर्गत असेल. 

 • अशिक्षित व्यक्तीकडे आवश्यक कागदपत्र नसतील तर ? 

अशा परिस्थिती त्यांनी इतर कोणते पुरावे, साक्षीदार किंवा समाजाने दिलेलं ओळखपत्र इत्यादी कागद सादर केले तरी चालतील. कागदपत्र नाहीत म्हणून कुठल्याही नागरिकांची अडवणूक किंवा छळ केला जाणार नाही. 

 • ट्रान्सजेंडर , निधर्मी, निरीश्वरवादी , आदिवासी , स्त्रिया , भूमिहिन  , दलित याना NRC तुन वगळण्यात येणार का ? 

NRC कधी कार्यान्वित झाल तर त्यामध्ये अशा कुठल्याही समाजाला, गटाला वगळण्यात येणार नाही.