CAA : सोनिया गांधींकडून देशातील नागरिकांची करण्याचा प्रयत्न : निर्मला सीतारमन

0
78
sonia gandhi

CAA : सोनिया गांधींकडून देशातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न : निर्मला सीतारमन 

नवी दिल्ली: देशात सर्वत्र सुधारित नागरिकत्व विधेयकावरून सर्वत्र आंदोलन सुरु असताना आटा याच मुद्यावरून राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या कायद्या विरोधातील आंदोलनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थतीवरून केंद्रातील सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्याच्या आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी प्रतिउत्तर दिले आहे. सोनिया गांधी ह्या देशातील नागरिकांची नागरिकत्व विधेयकाविरुद्ध दिशाभूल करत असल्याचा आरोप सीतारमन यांनी केला आहे. 

नागरिकत्व विधेयकावरून सत्ताधारी व विरोधी पक्षात आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहेत. तर जनतेला चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे.  मात्र सरकार त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा आवाज क्रूरपणे दाबत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी व्हिडीओ संदेशातुन शुक्रवारी केला होता. तर सोनिया गांधी यांनी केलेल्या आरोपाला भाजप कडून उत्तर देण्यात येत आहे.

सोनिया गांधी यांच्यावर आरोप करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन ,म्हणाल्या कि , सोनिया गांधी ह्या चुकीच्या पद्धतीने CAA ची तुलना NRC सोबत करीत असून, ज्याचा मुद्दा अद्याप तयार झाला नाही . तर सोनिया गांधी ह्या देशातील नागरिकांची नागरिकत्व व विधेयकावरून दिशाभूल  करत असल्याचा आरोप सुद्धा सीतारमन यांनी केला आहे. 

देशातील नागरिकांनी हिंसाचार आणि भीती पसरवणाऱ्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे. देशातील जनतेला कोणत्याही भीती खाली राहू नयेत,तर् काँग्रेस , तृणमूल आणि आदमी पार्टी तसेच डावे पक्ष सुधारित नागरिकत्व कायद्याला एनआरसीचा मसुदा अद्यापही तयार करण्यात आला नसल्याचे सुद्धा सीतारमन म्हणाल्या . 

तसेच देशातील जनतेने निराश झालेल्या काँग्रेस,टीएमसी , अप् आणि डाव्या पक्षातली नेत्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नयेत. तर नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात कोणत्याही भारतीयांचे नागरिकत्व काढून घेणार नाही. या कायद्याचा कोणत्याही भारतीय नागरिकांशी काही संबंध नसल्याचे सीतारमन म्हणाल्या .