“मागील काळातील सरकारच्या कॅगचा रिपोर्ट गंभीर: चोकशी करा” 

0
80
CAG

“मागील काळातील सरकारच्या कॅगचा रिपोर्ट गंभीर: चोकशी करा” 

गेल्या सरकारच्या कार्य काळात २०१७- १८ या आर्थिक वर्षात ६५ हजार ९२१ कोटी रुपयांचा घोळ झाल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. यावर राष्ट्वादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे. विद्यमान सरकारने याची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

कॅगचा अहवाल हि अत्यंत गंभीर बाब आहे. पाच वर्षात राज्याची आर्थिक स्थिती उध्वस्त झाली आहे. याची सखोल चौकशी करण्याची विनंती मी राज्य सरकारला करणार आईच. असे शरद पवार यान म्हणटले आहे. 

विधान सभेमध्ये काळ गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी  आर्थिक व्यवस्थेवरील लेखापरीक्षण अहवाल सादर केला. गेल्या सरकारच्या काळात झालेल्या ६५ हजार ९२१ कोटीच्या खर्चाची ३२ हजार ५७० उपयोगिता प्रमाणपत्रे सादर केली नाहीत. ज्या कारणासाठी हि रक्कम मंजूर झाली आहे, त्यासाठी तिचा उपयोग होतो कि नाही, यावर संबंधित विभागाचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होईल, उपयोगिता प्रमाणपत्रासाठी विलंब होण्यामुळे विधीचा दुरुपयोग तसेच अफरातफर होण्याचा धोका असल्याचे निरीक्षण भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक [ कॅग  ] यांच्या अहवालात नोंदविण्यात आले आहे. 

एल्गार परिषद प्रकरणी देखील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे. एल्गार प्रकरणातील चौकशीत पुणे पोलिसांचं वागणं आक्षेपार्ह आहे, असा आरोप पुण्यातील पत्रकार परिषदेत केला आहे. 

सरकारवर टीका केली म्हणून राष्ट्रद्रोही ठरवणं योग्य नाही. नामदेव ढसाळांच्या कवितेच्या ओळी वाचण्यासाठी तुरुंगात टाकणं हा सत्तेचा गैरवापर आहे. एल्गार परिषदेत सहभागी झाल्यामुळे अटकेत असल्याच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली. एल्गार परिषदेत सहभागी कार्यकर्त्यांना , साहित्यिकांना तुरुंगात डांबून ठेवणं चुकीचं आहे, असा आरोपही पवारांनी केला आहे. 

नागरिकत्व कायद्या वरून त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देशासमोर गंभीर प्रश्न आहेत. मात्र त्यापासून लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे. अर्थव्यवस्था संकटात आहे हे लपविण्यासाठी सरकारचा कट आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.