पेट्रोल पंप वितरक सुप्रीम कोर्टात जाणार

0
93

कोल्हापूर: भारत पेट्रोलियमच्या खासगीकरण प्रक्रियेला विरोध करण्यासाठी महाराष्टातील पेट्रोल, डिझेल वितरकाची फामपेडा हि संस्था सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशन [ फामपेडा] च्या नाही येथील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खासगीकरनंतर वितर्काचे अस्तित्व संपण्याची शक्यता बैठकीत वर्तवण्यात आली.

२०१६ साली केंद्र सरकाने बीपीएल [ भारत पेट्रोलियम] च्या खासगीकरणाला लोकसभेत मंजरी दिली . यामुळे हि कंपनी कोणत्याही देशातील किंवा प्रदेशातील कंपनीला विक्री करण्याची परवानगी मिळाली आहे. केंद्र सरकारचे भारत पेट्रोलिअममध्ये ५३. ३ % शेअर्स आहेत. खासगी कंपनीला ५१ % शेअर्सची विक्री करून सरकारला यातून अंदाजे ६० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. 

जानेवारी २०२० पासून  या कंपनीची लिलावाची प्रक्रिया सुरु होणार आहे. आणि मार्च अखेर खासगी कंपनी कडे भारत पेट्रोलियमची मालकी जाणार आहे. राज्यभरात बीपीएलचे २००० वितरक आहेत. या कंपनीचे वितरक होण्यासाठी बहुतेक पंप चालकांनी ३० वर्षासाठी करारावर आपल्या जागा लिहून दिल्या आहेत. कंपनी पेट्रोल आणि डिझेल सोडून अन्य कारणासाठी या जागेचा वापर करू शकते. असे करारात नमूद केलेले आहे/ त्यामुळे खासगीकरनंतर वितरकाचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या साठी फामपेडा संघटनेने या खासगीकरणाबाबत पेट्रोल, डिझेल असोसिएशनला विश्वासात घेणे गरजेचे आहे. अशी मागणी फामपेडाच्या बैठकीत करण्यात आली. सध्या सरकारकडे कोणत्याही प्रश्ना बाबत दाद मागता येते. पण, खासगीकरनंतर नवीन मालक हा केव्हाही रिफायनरींप्रमाणे आमच्या जागेचा  मालक कोण असणार कमिशनचे दर काय असणार असे अनेक प्रश्न पंप चालकांना पडत आहेत. 

त्यामुळे करारात नेमक्या कोणत्या गोष्टीचा समावेश असणार याची माहिती असोसिएशनला मिळत नाही, खाजगीकरणाला विरोध असणारच अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आलेलं आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात या प्रक्रियेलाच विरोध करणारी याचिका दाखल केली जाईल.