पंकजा मुडेंच्या गैरहजेरीवर चंद्रकांत पाटील म्हणाले. …

0
186
chandrakant-patil-pankaja-munde-1575285947

पंकजा मुडेंच्या गैरहजेरीवर चंद्रकांत पाटील म्हणाले. … 

भाजपच्या नेत्यापंकजा मुंडे या सोमवारी औरंगाबाद येथे झालेल्या पक्षाच्या विभागीय बैठकीत गैरहजर राहिल्या होत्या. परंतु, प्रकृती अवस्थांमुळे त्या बैठकीला आल्या नसल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पंकजा मुंडे यांनी या पूर्वीच बैठकीला येऊ शकणार नसल्याचे सांगत परवानगी घेतली होती, असेही पाटील यांनी माध्यमांना सांगितले आहे. 

पंकजा मुंडे बैठकीला न आल्याचे सांगताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, बैठकीसाठी औरंगाबादला येण्यापूर्वी पंकजा मुंडे याच्याशी बोलणे झाले होते. त्या आजारी आहेत . तसेच बारा डिसेंबर रोजी सुरु होणाऱ्या मेळाव्याची तयारी सुरु आहे. पूर्व परवानगी घेऊनच त्या अनुपस्थित राहिल्या आहेत. दोन दिवसानंतर परळी येथे जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

यासोबत भाजपच्या कोअर कमिटीची आज [ ता. `१०] मुंबईत होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपची हि बैठक होणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीला पंकजा मुंडे उपस्थितीत राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

काही दिवसापूर्वी पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर केलेली भावनिक पोस्ट आणि ट्विटरवर बदललेले प्रोफाइल या सर्व गोष्टीमुळे राजकीय वर्तुळात पंकजा मुद्दे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची अटकळ बांधण्यात आली होती. भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले . त्यानंतर पंकजा यांनी खुद्द मी भाजप पक्षाशी एकनिष्ठ आहे. आणि भाजपमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केले . असे असले तरी औरंगाबादमधील बैठकीला त्यांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.