ख्रिसमस : सांताक्लॉज , ख्रिसमस ट्री, जिंगल बेल्स, यांनी सजली बाजारपेठ

0
89

ख्रिसमस : सांताक्लॉज , ख्रिसमस ट्री, जिंगल बेल्स, यांनी सजली बाजारपेठ 

कोल्हापूर: अवघ्या चार दिवसांवर नाताळ म्हणजेच ख्रिसमस या ख्रिस्ती बांधवांच्या महत्वाच्या सणाची लगबग शहरात सुरु झाली आहे. शहरातील विविध चर्चमध्ये या सणाची जोरदार तयारी सुरु असून, चर्च विद्युत रोषणाईने सजले आहेत. 

नाताळ  हा आनंद व हर्षोउल्हासाचा सण  आहे. “ ख्रिसमस “ या शब्दाचा अर्थ म्हणजे ‘क्राइस्टर्स  मास ‘ अर्थात प्रभू येशूचा जन्म दिवस होय. हा सण बुधवारी दि २५ तारखेला साजरा होणार आहे. जरी ख्रिस्ती बांधवांचा हा सण असला तरी सर्व धर्मीय नागरिकही आपलाच सण म्हणून हा सण साजरा करतात. 

या सणाच्या निमित्याने खास ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजचे कपडे, बक्षिसाची पोटली, हि फक्त लहानाची नव्हे तर थोरामोठ्यांचीहि आकर्षण असते. अजूनही पालक लहान मुलाच्या उशाला त्यांचे आवडते गिफ्ट ठेवतात आणि सांताक्लॉज च्या आठवणीत लहान मुले रंगून जातात. त्यांना वाटते सांता  येऊन गिफ्ट ठेऊन गेला. 

नाताळच्या आता चार दिवसांवर आल्याने ख्रिस्ती बांधवाच्या घरी सणाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. शहरातील विविध चर्चनाही रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सणासाठी बाजारपेठ फुलली आहे. 

शहरातील पापाची तिकटी पाईपलाईन , राजारामपुरी, मध्यवर्ती बसस्थानक या महत्वाच्या बाजारपेठेत लहान – मोठ्या आकारचे ख्रिसमस ट्री, जिंगल बेल्स, चांदण्या, सांताक्लॉज ची टोपी , सांताचे शर्ट, कपडे चॉकलेट, कॅडबरी , सजावटीचे बॉल्स, विविधरंगी मेणबत्या, विशिष्ट आकाराच्या जिंगल बेल्ससह विविध वस्तुंना मोट्या प्रमाणावर मागणी आहे. 

नाताळमध्ये  केक आणि डोनेटला खूप मागणी आहे. केक व डोनेटचे महत्व तर या सणाला अनन्यसाधारण आहे. विविध आकारातील संवादातील साधे पेस्ट्री, चीज,या प्रकारच्या केकनी बेकऱ्या सजल्या आहेत. असे साहित्य केवळ ख्रिस्ती बांधव खरेदी करत नाहीत, तर अन्यधर्मीय बांधवही अशा साहित्याची खरेदी करताना दिसत आहेत. 

साहित्याचे दर 

ख्रिसमस ट्री – १ ते १२ फूट उंचीचे [ किंमत ५० ते ३००० रु. ] , सांताक्लॉज पुतळा – ३ ते १० हजार, गवाणी पुतळा ५० ते २०० रुपये, डेकोरेशन टेडी, जिंगल बेल्स – १० ते ८०० रु. सर्व थर्माकोल प्लास्टिकविहरीत बाजारपेठेत उपलब्ध आहेत.