नागरिकत्व कायदा , NRC म्हणजे काय

0
71
nrc

नागरिकत्व कायदा , NRC म्हणजे काय ?

दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर त्याला राज्यसभेतहि मजुरी मिळाली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहात केंद्र सरकारनं मंजूर करून घेतलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याला मात्र देशभरातून विरोध होत आहे. देशाच्या अनेक राज्यात निदर्शने, मोर्चे, आणि आंदोलन झाली. काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण लागले

१] CAA  कशाचे संक्षिप्त रूप आहे. ? 

सिटिझनशिप अमेंडमेंट अक्ट अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा 

 

२] CAB कशाचं संक्षिप्त रूप आहे.? 

सिटिझनशिप अमेंडमेंट बिल अर्थात नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 

 

३] काय आहे नागरिकत्व कायदा 

या कायद्यानुसार हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ईसाई धर्माचे जे सदस्य ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, बांग्लादेश, आणि अफगाणिस्तानातून भारतात आले आहेत, आणि ज्यांना त्या देशामध्ये धार्मिक अन्याय सहन करावा लागला आहे, अशा नागरिकांना बेकायदेशीर प्रवासी मानता येणार नाही. तर, या कायद्यानुसार आता अशा नागरिकांना भारताची नागरिकता देण्यात येणार आहे. 

 

४] फायदा कोणाला नाही? 

श्रीलंका, तामिळ, म्यानमार मधील मुस्लिम तसेच, पाकिस्तान मधील मुस्लिमातील अन्य समुदायातील व्यक्तीना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही. 

 

५] कोणाला लागू नाही? 

घटनेच्या सहाव्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या आसाम , मेघाचंल , मिझोराम, आणि त्रिपुरा या राज्यातील आदिवासी भागांना , तसेच बंगाल ईस्टर्न फ्राटियर रेग्युलेशन, १८७३ मध्ये अधि सूचित केलेल्या भागांना हि दुरुस्ती लागू नाही. 

 

६] NRC कशाचं संक्षिप्त रूप आहे ? 

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स