काँग्रेस मुक्त हिंदुस्थान बनवता बनवता अनेक राज्यच भाजप मुक्त झाली

0
85

मुंबई: झारखंडच्या जनतेनं भूलथापाआणि आमिषांना बळी न पडण्याचं नाकारलं. तसेच लोकांनी ठरवलं कि ते सत्ता , दबाव आणि आर्थिक दहशदवादाची पर्वा करत नाहीत, अशा शब्दामध्ये शिवसेनेनं सामना मधून भाजपला लक्ष केले आहे. भाजपला झारखंडमधील सत्ता गमवावी लागल्यानंतर जुन्या मित्र पक्षाला शिवसेनेनं लक्ष केलं. झारखंड बेडरपणे बदलला सामोरे गेले. भाजप एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहे. हे असे का घडले? याचा विचार करतील अशी त्यांची मानसिकता नाही. जनतेला गृहीत धरलं कि, आणखी काय वेगळं घडणार? असा सवाल उपस्थित करत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. 

झारखंडमधूनही भाजपचे राज्य गेलं . आधी महाराष्ट्र हातातून गेला आणि आता झारखंड देखील गेलं. महाराष्ट्र व झारखंड यांची तुलना करता येणार नाही. पण, भाजपने आजून एक राज्य गमावलं. पंतप्रधान , गृहमंत्री यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ राबवूनही भाजपला झारखंड राखता आलं नाही. झारखंडचे मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री होतील. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांची आघाडी बहुमताचा आकडा गाठणार हे स्पष्ट आहे या आघाडीत सर्वात जास्त जागा झारखंड मुक्ती मोर्चाला मिळाल्या आहेत. तसेच काँग्रेसनेही दोन आकडी टप्पा गाठला आहे. तर राजदलाही पाच- सात जागा मिळाल्या आहेत. थोडक्यात , काँग्रेस- राजदलाच्या पाठींब्यावर झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार तेथे येत आहे. आणि भाजपसाठी हे धक्कादायक आहे. काँग्रेस मुक्त हिंदुस्तानची घोषणा भाजपचे नेते करत होते, पण आता अनेक राज्यही भाजप मुक्त झाली. अशा शब्दात शिवसेनेनं भाजपावर टीका केली. 

२०१८ साली भाजप साधारण ७५ % प्रदेशात सत्ता ठेऊन होती. आता जेमतेम ३०-३५ . % प्रदेशात भाजपाची सत्ता दिसत आहे. भाजपाची  आता घसरगुंडी झाली आहे. हे चित्र विचार करायला लावणारे आहे. देशात २०१८ ला २२ राज्यात भाजपची सत्ता होती. ईशान्येकडील राज्यातही भाजप घुसली. त्रिपुरा ,मिझोरामपर्यंत त्याचे झेंडे फडकले., पण आता  त्रिपुरात निवणूक घेतल्या तर तेथील जनताही भाजपचे सत्ता उलथून लावील अशी स्थिती आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यांच्या संदर्भात सगळ्यात जास्त त्रिपुरात हिंसाचार झाला व तो रोखण्यात भाजप अपयशी ठरलं. हे संपूर्ण देशातच घडताना दिसत आहे, असं म्हणत भाजपचा समाचार घेतला.