CSK ला धक्का : दीपक चहर IPL ला मुकणार

0
78

भारतीय संघाचा गोलंदाज दीपक चहर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यातून दुखापतीमुळे माघार घेतली होती. आगामी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआय ने सोमवारी जाहीर केलेल्या संघात त्याला स्थान मिळालेले नाही. त्यामुळे दीपक चहरची दुखापत गंभीर असल्याची बाब समोर येत आहे. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्या अनुपस्थितीत मिळालेल्या संधीच सोन करत, प्रभावी कामगिरी केली. पण दुखापतीन घेरलं. निवड समितीच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक चहर आगामी इंडियन प्रीमिअर लीगच्या [ आयपीएल २०२० ] काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे चैनई सुपर किंग्सच्या [ ।CSK ] चमूत चिंतेचे वातावरण बनले आहे.

बांग्लादेश विरुद्धच्या ट्वेन्टी – २० मालिकेत त्यानं ७ धावांमध्ये ६ विकेट घेत विश्व विक्रम केला होता. ट्वेन्टी – २० क्रिकेट मधील हि सर्वोत्तम गोलंदाजी आहे. या शिवाय त्यानं या सामन्यात हॅट्रिक घेतली आणि २० -२- हॅट्रिक घेणारा तो भारतीय पहिला गोलंदाज ठरला. त्याच्या नंतर सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी- २० स्पर्धेत त्याची हॅट्रिक थोडक्यात हुकली, परंतु, त्यानं एका षटकात तीन विकेट्स घेतल्या. या कामिगिच्या जोरावरच त्यानं विंडीजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात स्थान पटकावले. दोन सामन्यात त्यानं साजेशी कामगिरी केली, त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. आणि नवदीप सैनीला संधी मिळाली.

टीम इंडियाचे निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी दीपक च्या दुखापतीबाबत चिंता वाढवणारी माहिती दिली. एमएसके प्रसाद म्हणाले, “मार्च -एप्रिल पर्यंत दीपक पुनरागमन करेल, असे मला वाटत नाही. आमच्याकडे तीनही फॉरमॅटसाठी पुरेसा बॅकअप आहे. त्यामुळे टीम इंडियाला पुढील सहा ते सात वर्ष चिंता करण्याची गरज नाही “ .