उपमुख्यमंत्री कोण अजित पवार कि जयंत पाटील

0
74
Ajit_PAwar_Jayant_PAtil

उपमुख्यमंत्री कोण अजित पवार कि जयंत पाटील ? 

राष्ट्रवादी आमदारांच्या वाढत्या दबावामुळे अजित पवार याचा मंत्री मंडळात समावेश निश्चित झाला आहे , पण उपमुख्यमंत्री मात्र अजित पवार कि जयंत पाटील यांच्यात चुरस सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कुणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात याकडे राष्टवादीच्या आमदारांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मंत्रिमंडळ विस्तार तसेच खातेवाटप याबाबत सुमारे दोन तास चर्चा झाली. यावेळी खातेवाटप लवकरच जाहीर केर, असा सल्ला पवार यांनी ठाकरेंना दिल्याचे समजते. 

सरकार स्थापन होऊन दहा दिवस झाले तरी मुख्यमंत्री हे केवळ सहा मंत्री कारभार करत आहेत. या मंत्र्यांना खात्याचे वाटपदेखील झालेले नाही. कोणती खाती , कोणत्या पक्षाकडे असावीत यावर अजून तिन्ही पक्षात एकमत झालेले नाही. शिवाय काँग्रेसमधील इच्छुकुमेद्वारांनी दिल्लीत धाव घेतल्याने अजून अंतिम यादीच तयार झाली नाही , असे सांगण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी विश्वास दर्शक ठराव जिकल्यानंतर खातेवाटप होईल अशी चर्चा होती. मात्र अजून एकमतच झालेले नसल्याने खातेवाटप रखडल्याचे समजते. आज संध्याकाळी नेहरू सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुमारे दोन तास बैठक झाली. यावेळी जयंत पाटील यांच्यासह अन्य महत्वाचे नेते उपस्थित होते. 

हिवाळी अधिवेशन पुढच्या आठवड्यात सुरु होत असून, त्यापूर्वी विस्तार नाही, तरी खाती वाटप झाली पाहिजे अशी भूमिका यावेळची पवार यांनी मांडली . प्रत्येक पक्षाच्या वाट्याला जी मंत्री पदे द्यायची असतील ती त्या त्या मंत्र्याकडे सोपवावीत. असे यावेळी ठरले . येत्या एक-दोन दिवसात यावर निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी सांगितलं. 

विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेस कडे गेल्याने राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री पदावर दावा केला . गाजलेल्या सिंचन घोटाळ्यात तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांचा संबंध नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागांकडून स्पष्ट झाल्याने अजित पवार याना मंत्रिमंडळात घ्यावे अशी, राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांची इच्छा आहे. पवार यांच्या बंडाची शिक्षा म्हणून त्यांना सध्या तरी मंत्री करून नये, अशी शरद पवार याची इच्छा असल्याचे बोलले जातं असलं तरी अजित पवार हे मंत्रिमंडळात असले तर योग्यप्रकारे समन्व्य साधला जाईल, असे या आमदारांचे म्हणणे आहे. स्वतः अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यास उत्सुक असून, जयंत पाटील यांच्याशी त्यांची चुरस आहे. , यावर अंतिम निर्णय शरद पवार हेच देतील. 

दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या आधी  करावा असे महाविकास आघाडीच्या आमदारांचा आग्रह आहे. मात्र , काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीनी आपली यादीच अंतिम केलेली नाही . अनेक इच्छुकांनी दिल्लीत ठाण मांडून तेथून काही होते का, याबद्दल प्रयत्न सुरु ठेवले आहेत. मात्र हिवाळी अधिवेशनंतरच विस्तार करावा अशी काँग्रेस वरिष्ठ नेत्यांची इच्छा असून, शरद पवारांनीही मान्यता असल्याचे समजतंय. या दोन्ही पक्षात इच्छुकांची संख्या मोती असल्यानाने निर्णय घेणे अवघड आहे असे एका नेत्याने  दैनिक ‘ पुढारी ‘शी बोलताना सांगितलं. शिवसेनेतही चुरस असली, ‘तरी उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेणार असल्याने त्यांना फारशी अडचण येणार नाही. 

T तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रादेशिक समतोल तसेच सामाजिक न्याय याचे भान ठेऊन निर्णय घेण्याची कसरत करावी लागणार आहे. राष्ट्रवादीने गृह, अर्थ, यांसारख्या महत्वाच्या खात्यावर दावा केला असून, त्यासाठी राष्ट्रवादीच्यात  रस्सीखेच सुरु आहे. दरम्यानच्या तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री सर्वच खात्याचा कारभार करू शकत असले तरी लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप झाल्यास हिवाळी अधिवेशनात विरोधक सडकून ठीका करतील, त्यामुळेच या गोष्टी लवकरात लवकर व्हाव्यात , असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं .