“तोंडास पावडर आणि ओठास लाली लावून बसलेल्यानी खिडकीही बंद करून घ्यावी”

0
70
Devendra_Fadnavis_1_0

“तोंडास पावडर आणि ओठास लाली लावून बसलेल्यानी खिडकीही बंद करून घ्यावी” 

मुंबई: २०१९ मध्ये फडणवीस व त्यांच्या मायबापानी शब्द पाळला नाही आणि महाराष्ट्रात त्यांच्यावर राजकीय बेकार होण्याची वेळ आली. आता तर शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यानी खिडकीही बंद करून घ्यावी, अश्या शब्दात बोचरी टीका केली आहे, आपल्यात आता कोणतेही नाते उरलेले नाही . नात्याचेही तसे ओझे होते. तेही उतरले , असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. 

भाजपचे ३० वर्षाचे ओझे उतरवले असल्याची शुभ वार्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे । हा प्रयोग गेली ३० वर्षे चालत होता. आता हे ओझे उतरवल्याची अधिकृत घोषणा नागपूरच्या विधानसभेत मुखमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनीच हे जाहीर केल्यामुळे भाजपचे खिडकीत बसून ‘ शुक शुक करणे , शीळ मारून लक्ष वेधून घेणे, दरवाजे उघडे आहेत. आम्ही आजही वाटाघाटीस तयार आहोत, अशी डबडी वाजविणे बंद केले पाहिजे, असा सूचक इशारा शिवसेनेने सामानाच्या अग्रलेखातून दिला आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेसाठी दरवाजे अजूनही खुले असल्याचे म्हटले होते. त्यावर शिवसेनेने पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे. 

भाजपचे ओझे फक्त शिवसेनेनेच उतरवले नाही तर भाजपची सत्ता एकदाची गेल्यामुळे महाराष्टाच्या मनावरील ओझेही उतरवले. ओझे व ताण इतका उतरला कि, एकनाथ खडसे यांच्यासारखा नेता आता खुलेपणाने बोलू लागले आहेत. खडसे याना आता इतके मोकळे वाटू लागले आहे कि, ते एकाच वेळी पवारांना भेटतात व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतात. पंकजा मुंडे यांचीही भूमिका वेगळी नाही. प्रत्येकजण मनावरील ओझे फेकून देत आहे व मोकळा श्वास घेत आहे, असे शिवसेनेने म्हंटले आहे.