धनंजय मुंडे मंत्रिमंडळात नसणार

0
94
dhananjay-munde-ncp-1574513075

 

मुंबई 

भाजप नेत्या आणि आपली बहीण पंकजा मुडेंना धूळ चारत परळीमधून विजयी झालेले धनंजय मुंडे याना मंत्रीपद मिळणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र याबरोबरच त्यांना पक्ष मंत्री पद सोडून वेगळीच जबाबदारी देण्याच्या तयारीत असल्याचे कळत आहे. पक्षश्रेष्ठीच्या मनात सध्या काही तरी वेगळे सुरु असून त्यांच्यावर पक्षवाढीच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष पदी महत्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची सध्या चर्चा आहे. 

महंत नामदेव शास्त्री यांनी राष्ट्रवादीचे आमदार. धनंजय मुंडे याना मंत्री झाल्यानंतर भगवानगडावर येण्यासाठी निमंत्रण दिले होते. पण आता मंत्री झाल्यानंतर गडावर जाण्याचा योग्य हा योग्यच राहणार असे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या आक्रमक आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाचा फायदा पक्षाला झाला आणि राष्ट्रवादी पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या. 

मंत्रिपदाबाबत स्वतः मुंडे आग्रही असल्याची चर्चा आहे. पण आता त्याच्यातील नेतृत्वगुणांना आणखीन बाबा देण्यासाठी पक्ष वेगली जबाबदारी देणार आहे. त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे., असे सूत्रांकडून कळते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कडून दुसऱ्या प्रदेशाध्यक्षाची शोध मोहीम सद्य सुरु आहे. 

त्यामुळे हि दुसरी व्यक्ती म्हणून धनंजय मुंडे यांच्या नावाला पक्षातील अनेक नेत्यांनी पसंती दिली आहे. असेच काहीसे चित्र काँग्रेस मध्ये आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्याने वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण याची वर्णी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी लागण्याची दाट शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी खुद्द काँग्रेस हायकमांड यांचीच इच्छा असल्याचे कळत आहे.