डिझेलच्या किंमतीतही मोठी वाढ : तर पेट्रोलचे दर वार्षिक उच्चांकावर

0
63
petrol

डिझेलच्या किंमतीतही मोठी वाढ : तर पेट्रोलचे दर वार्षिक उच्चांकावर 

नवी दिल्ली: पेट्रोलच्या किमती पुन्हा वाढू लागल्या असून लोकसभा निवडणुक काळात स्थिर राहिलेल्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आज पेट्रोलची किंमत ९ पैशानी वाढल्याचे यंदाचा उच्चांक गाठला आहे. तर डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली असून लिटरमागे २६ पैशानी महागले आहे. 

नवी दिल्लीमध्ये आज पेट्रोलची किंमत ७५ रुपये तर डिझेलची किंमत ६६. ०४ रुपये झाली. तर मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत ८०. ६५ रुपये आणि डिझेलची किंमत ६९. २७ रुपये झाली आहे. बेगळुरु मध्ये ७७. ५७ रुपये पेट्रोल आणि ६८. २९ डिझेलची किंमत झाली आहे. तर हैद्राबाद मध्ये पेट्रोलसाठी ७९. ८१ रुपये आणि डिझेलसाठी ७२. ०७ रुपये मोजावे लागणार आहेत. 

डिसेंबरमध्ये मुंबईत पहिल्या आठवड्यात एकदाच डिझेलची वाढ झाली होती. हि वाढ ६ पैशाची होती. तर आज मोठी वाढ झाली आहे. तर पेट्रोलमध्ये १४ पैशाची वाढ झाली आहे. काल पेट्रोलचा दर ८०. ५१ रुपये होता. जानेवारी २०१९ मध्ये पेट्रोलचा दर ७३. ९५ रुपया एवढा खाली गेला होता.तर २ ऑक्टोबरला पेट्रोलचा दर ८०. २१ रुपये होता. आज किमतींनी वर्षाचा सर्वाधिक दर गाठला आहे. 

सौदी अरेबियाने कच्च्या तेलाचे उत्पादन लक्षणीय कपात करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे दर आता जवळजवळ सर्वोच्च पातळीच्या जवळपास आहेत.