देशाची दुफळी करणाऱ्या नागरिकत्व कायद्याला विरोध करा

0
82
pannalal surana

देशाची दुफळी करणाऱ्या नागरिकत्व कायद्याला विरोध करा. 

कोल्हापूर : देशाची दुफळी माजवणा  या नागरिकत्व कायद्याला जनतेकडून कडाडून विरोध करावा , असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी रविवारी कोल्हापुरात केले. सोशालिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे पाचवे द्वैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन चित्रदुर्ग मठात आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाच्या अध्यक्ष स्थानी प्रदेशाध्यक्ष हसन देसाई होते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस , महापौर अँड सुमंजिरी लाटकर जे. यू , नाना ठाकरे, स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने, मीरासाहेब मगदूम, आदी उपस्थित होते. 

सुराणा म्हणाले, केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीरविषयक नीतीचा व दडपशाहीचा निषेध केला पाहिजे. बहुमताच्या जोरावर कायदे लादणे चुकीचे आहे. श्रीपाल सबनीस म्हणाले, समाजवादाचे ध्येय हे कार्यकर्त्यांना बळ देणे आहे, पण सद्यस्थितीत संवादाच्या जागा प्राप्त करण्याचे मोठे आव्हान आहे. समाजवादी नेत्यांनी स्वतःमध्ये बदल करून राजकारण करावे, असे आवाहन त्यांनी केले. मुद्द्यावरून त्यांनी भाजप नेत्याचा निषेध केला. 

  • अधिवेशनातील ठराव

देशात दुफळी माजविण्याचे दुष्ट्कर्म थांबवा.शेतकरी,बेरोजगार तरुण मागास विद्यार्थी यांचे पक्ष अग्रक्रमाने सोडवा. तसेच सर्व राज्यकारभार मराठीतून चालवावा. बंद केलेल्या प्राथमिक शाळा चालू कराव्यात. पुरबाधित अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार साहाय्य दोन महिन्यात द्यावे. आणि मागास जातीजमातीचे विद्यार्थी आश्रम शाळा चालू कराव्यात. बालगृहांचे थकीत अनुदान द्यावे. रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी खास प्रयत्न करावेत. आणि पन्नास पैशाचे पोस्ट कार्ड चालू ठेवा. 

  • नवीन जखमा नकोत-कोल्हे 
  • सांगली     ; देशाची फाळणीवेळी झालेल्या जखमा भरण्याची गोष्ट चांगली पण, जुन्या जखमा भरत असताना नवीन जखमा होणार नाहीत, यांचे भान राज्यकर्त्यांनी ठेवले पाहीजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची ताकत असलेली माणसे मंत्री मंडळ मध्ये नाहीत. अशी टीकाही त्यांनी केली नव्या सरकारने  राज्याची तिजोरी रिकामी असतानाही शेतकऱयांची दोन लाख पर्यंतची कर्ज माफ करण्याची तयारी दाखवली आहे. या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.