कल्याण – डोंबिवली दरम्यान पॉवरब्लॉक वेळेआधीच संपला ; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

0
80
Dombivli_railway_station_-_Stationboard

डोंबिवली: ठाकुर्ली स्थानकामध्ये गर्डर टाकणाच्या कामासाठी घेतलेल्या ४ तासांच्या पॉवरब्लॉक मुळे  प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दर १५ मिनिटांनी डोबिवलीहून सीएसटीकडे लोकल सोडण्यात येणार होती. मात्र हे नियोजन फसल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा वापर करावा लागला. प्रवाशांना टॅक्सी रिक्षा वाहतूक करावी लागली. रिक्षा , टॅक्सी वाल्याकडून मोठी लूट करण्यात आली. 

दुपारी १२ ५५ मिनिटांनी गर्डर टाकण्याचे काम संपले असून लवकरच लोकल सोडण्यात येणार आहेत. सर्वाधिक गर्दीच्या स्थानकातील रेल्वे प्रवाशांचे हाल झाले असून या स्थानकातून दर १५ मिनिटाला लोक रेल्वे सोडण्याचा रेल्वेचा प्रयत्न होता. परंतु तो पूर्णपणे फेल ठरला. तासाभराने एखादी लोक आल्याने स्थानकात प्रचंड गर्दी झाली होती. लोहमार्ग पोलिसांनीही रेल्वे अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. तेव्हा विनंतीवरून दोन रिकामे रेकन पाठवण्यात आल्याने दोन तासांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात आले. 

 

खारघरावरून आलेल्या महिलेकडून कल्याण-उल्लासनगर जाण्यासाठी ४०० रुपये भाडे आकारण्यात आले. एरव्ही हि वाहतूक सुमारे ५० रुपयात शेअर , टप्पा पद्धतीने होते. आज ब्लॉकमुळे रिक्षा चालकांनी लूट सुरत केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

ठाकुर्ली पादचारी पुलाचे गर्डर चे काम करण्याआधी त्याची विधिवत पुजन रेल्वे अधिकाऱ्यांनी केली होती.