जिल्हा परिषद अध्यक्ष निवड हालचालींना वेग

0
78
district council

जिल्हा परिषद अध्यक्ष निवड हालचालींना वेग. 

कोल्हापूर: जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ व जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे याची रविवारी सायंकाळी सर्किट हाऊस येथे बंद खोलीत चर्चा झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही सदस्यांनी सायंकाळी उशिरा आ. मुश्रीफ याची सर्किट हाऊस येथे भेट घेतली. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष , उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हा परिषदेत भाजप आघाडीची सत्ता आहे. हि सत्ता टिकविण्याचे आव्हान भाजप नेत्यांसमोर आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी पुन्हा काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आणण्याचा निर्धार केला आहे. सत्तेसाठी दोन्ही बाजूनी चर्चा सुरु केल्या आहेत. 

महापालिकेतील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे काम आमदार मुश्रीफ व आमदार कोरे यांनी प्रथम केले. १६ ते १७ वर्ष महाडिक यांचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व होते. राष्ट्रवादीची स्थापना झाली, तेव्हाच आमदार कोरे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना केली. महापालिकेच्या निवडणुकीत त्यावेळी आमदार मुश्रीफ व आमदार कोरे यांनी  आघाडी केली. आणि महापालिकेत जनसुराज्य शक्ती-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा महापौर केला. तेव्हापासून जिल्हाच्या राजकारणात आमदार मुश्रीफ व आमदार कोरे याची मैत्री आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेली. आमदार कोरे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर कोरे यांनी ५ वर्ष कोरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हा परिषदेत सध्या ते भाजपसोबत आहेत. आणि आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. 

जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वांनीच जुळवाजुळव करण्याचा प्रतत्न सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी आ. मुश्रीफ आणि आ. कोरे यांची झालेली भेट हा चर्चेचा विषय ठरला आहे. कोरे व मुश्रीफ यांनी अर्धा तास बंद खोलीत चर्चा केली. त्यामुळे आ. कोरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जि. प सदस्यांची देखील सायंकाळी सर्किट हाऊसवर गर्दी झाली होती. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी आ. मुश्रीफ यांची भेट घेतली. 

  • शिवसेना संपर्क प्रमुख दुधवडकर बुधवारी कोल्हापुरात 

जिल्हा परिषदेच्या राजकारणात शिवसेनेला अतिशय महत्व आलेय .त्याचे दहा सदस्य असल्यामुळे जिल्हा परिषदेत कोणालाही सत्ता स्थापन करता येनार नाही . शिवसेनेच्या सदस्याबाबत सोमवारी आपण चर्चा करणार असल्याचे प्राध्यापक संजय मंडलिक यांनी सांगितले. कोल्हापूरचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर बुधवारी [ दि. २५ ] कोल्हापुरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सर्व सदस्यांची बैठक होणार आहे. 

  • जनसुराज्य शक्ती भाजपसोबत : आ. विनय कोरे. 

जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये जनसुराज्यने पाच वर्ष भाजप सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये काही बदल होणार नाही. यानंतर देखील ठरल्याप्रमाणे आम्ही भाजप सोबतच राहू, असे जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष आ. विनय कोरे यांनी रात्री उशिरा पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.