देवेंद्र फडणवीस : सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात

0
91
devendra-fadnavis

देवेंद्र फडणवीस : सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात 

कोल्हापूर : सातबारा कोरा करण्याची घोषणा हि फक्त कागदावरच राहिली. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, हिवाळी अधिवेशन हि फक्त एक औपचारिक होती, असे सांगून मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, असा टोला माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत लगावला. कॅबिनेटमध्ये जे निर्णय झाले ते एकमताने झाले. सेना – भाजप यांनी एकत्रीकरण केले. त्यामुळे आटा या कामांना  स्थागिती देण्यात काहीच अर्थ नाही. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. विश्वासघात करून सत्तेवर आलेल्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. 

देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर असून त्यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री सत्तेवर येण्यापूर्वी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली होती. पण  प्रत्यक्षात मात्र या सरकार कडून काहीच मिळाले नाहीत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नाही. सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप यांनी केला.

फडणवीस म्हणाले , सरसकट कर्ज माफी , सातबारा कोरा या केवळ घोषणाच ठरल्या. केवळ दोन लाखपर्यंत पीककर्ज माफ करण्याचा निर्णय या सरकारने घेतला., हि फसवी कर्जमाफी आहे. सप्टेंबर २०१९ला असणारे थकीत कर्ज माफ केले जाणार आहे. याचा फायदा कोल्हापूर, सांगली, सातारा या पूरग्रस्त जिल्ह्याना मिळणार नाही. अवकारली पावसामुळे सुमारे ९५ लाख हेकटरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. माफ केलेले कर्ज मार्च २०२०ते सप्टेंबर  २०२० या काळात दिले जाणार आहे. यामुळे नुकसानग्रस्तांना तातडीची मदतीची गरज असताना ती केली गेली नाही. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार नाही . 

फडणवीस म्हणाले, भारताचे नागरिकत्व देणारा या कायदा आहे, नागरिकत्व काढून घेणारा हा कायदा नाही. फाळणीनंतर अल्पसंख्यांकांचे संरक्षण करणे, हे भारतसह पाकिस्तान , बांग्लादेश यांचे कर्तव्य होते. पण अल्पसंख्याकांची सुरक्षा पाकिस्तान आणि बांग्लादेश यांनी केली नाही. हा कायदा अल्पसंख्यकांचे संरक्षण करणारा कायदा आहे. हा कायदा कोणत्याही धर्मा विरोधात नाही. काही पक्ष हा मुद्दा पेटवत असल्याचे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले .