आर्थिक मंदी वरून देशाचे लक्ष वळवण्यासाठी अमित शाहांची सीएए खेळी यशस्वी – राज ठाकरे

0
86
pro-CAA-protest

आर्थिक मंदी वरून देशाचे लक्ष वळवण्यासाठी अमित शाहांची सीएए खेळी यशस्वी – राज ठाकरे

पुणे: नागरिकत्व दुरुस्ती  कायद्याविरुद्धचे आंदोलन देशाच्या विविध भागामध्ये पेटतच चालले आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. 

देशासमोर आर्थिक मंदीचे मोठे संकट उभे आहे. त्यामुळे केंद्र सरकार मतदाराच्या कोंडीत सापडले असते. म्हणून अमित शाहानी अशी खेळी केली कि नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यासारखे मुद्दे उपस्थित करून आर्थिक मंदीवरून देशाचे लक्ष वळवले त्यात ते यशस्वी झाले. त्यासाठी त्याचे अभिनंदन असे म्हणत राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली. 

आपलीही देशात १३५ कोटी लोक राहत आहेत. या लोकांचा भार सांभाळण्यात देश कमी पडतोय. अशा परिस्थितीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे बाहेरच्या लोकांना आपण भारतात घेत आहोत. त्याची व्यवस्था कोण करणार ? असा सवाल करत राज ठाकरे म्हणाले, “ इथली व्यवस्था कोसळली आहे. जे इथले मुस्लिम नागरिक आहेत याना असुरक्षित वाटण्याचे कारण नाही. मात्र बांग्लादेश, नेपाळ, पाकिस्तान, मधून किती मुस्लिम आले आहेत हे तपासून बघायला हवे. त्यांच्या सोयी लावण्यासाठी देश नाही. माणुसकीचा ठेका फक्त भारताने घेतलेला नाही. भारत धर्मशाळा नाही. बांगलादेशातील नारिकाना हाकलून दिले पाहिजे “ . 

आधार कार्डद्वारे लोक मतदान करतात, मग त्यावरून नागरिकत्व का सिद्ध होऊ शकत नाही , आणि जर आधार कार्डचा काहीही उपयोग नसेल ते त्यासाठी लोकांना रांगेत का उभे केले ? हा सर्व खटाटोप केला, तो कशासाठी होता. ? दरवेळी बॉम्बस्फोट झाल्यावर आपल्याला हे मुद्दे आठवतात , असे काही कडक पावले उचलावे लागतील अन्यथा हा हाताबाहेर गेलेला देश आहे. केंद्र सरकार,भाजप आणि इतर पक्षांनी राजकारण करू नये,असे राज ठाकरे यांनी ठणकावले आहे.