पॅन नंबर चुकल्यास कितीला कात्री लागते

0
86
pancard

आधार नंबर आणि पण नंबर असल्याशिवाय प्राप्तिकर विवरण भरता येत नाही. परंतु त्याचा वापर करताना चूक झाल्यास दहा हजार रुपयाचा दंड भरण्याची वेळ येऊ शकते. यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्रालयाने नियमांची अधिसूचना काढली आहे. म्हणूनच प्राप्तिकरदात्याने आधार नंबर आणि पण नंबर टाकताना काळजी घेणे गरजेचे आहे, कारण , जर खबरदारी न घेता घाईघाडबडीत चुकीचा नंबर टाकल्यास दहा हजाराचा दंड बसू शकतो. 

केंद्र सरकारने २०१९ च्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर अधि-नियम २७२ बी मध्ये संशोधन केले आहे. त्यामध्ये प्राप्तिकर अधि नियम कलम २७२ नुसार जर एखाद्या व्यक्तीने भरलेले पॅन किंवा आधार क्रमांक चुकीचा असेल, तर प्राप्ती अधिकारी त्यास दहा हजाराचा दंड आकारु शकतो. कर सल्लागार के सी . गोदुका यांच्या मते, प्राप्तिकरदात्यास कर आकारल्यानंतर संबंधित व्यक्तीस आपली बाजू मांडण्याचा अधिकार दिला जाऊ शकतो. पण अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी हि अधिकाऱ्याची राहील.  रिटर्न भरण्यापूर्वी प्रात्प्तीकर खात्याच्या संकेतस्थळावर पॅन पडताळणी करण्याचा पर्याय समोर येतो. आणि त्यानंतरच रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरु होते.