गरिबाना शिकावं कि नाही, FTII मध्ये केवळ Entrance EXAM ची फी तब्बल १० हजार

0
79
ftii

गरिबांना शिकावं कि  नाही, FTII मध्ये केवळ Entrance EXAM ची फी तब्बल १० हजार 

पुणे : 

दिल्लीतील जेएनयू विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातून  वसतिगृहात शुल्क वाढीच्या आंदोलावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, त्याचा देशभरातुन जाहीर निषेध करण्यात आला . या आंदोलनातील विद्यार्थ्यांनी हॉस्टेल मधील फी वाढीला विरोध दर्शवला होता, आता पुणे आणि कोलकत्ता येथील शासकीय चित्रपट संस्थे मध्येही फी वाढ केल्याचं दिसून येतंय. पुण्यातील विद्यार्थी संगटनेनेही या फीवाढीला विरोध केला आहे. 

पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया आणि कोलकत्ता येथील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया यांच्यामार्फत संयुक्तपणे उपस्थित केले आहेत, कारण , सन २०१५ मध्ये या परीक्षेसाठी केवळ २००० रुपये फी घेण्यात येत होती, तर २००४ मध्ये तीच फी ४००० हजार रुपये करण्यात आली. मात्र, यंदाच्या प्रवेश परीक्षेसंदर्भात जाहिरात निघाली असून त्यामध्ये फी साठी भरमसाठ वाढ केली आहे . संस्थे कडून करण्यात आलेल्या फी वाढीला एफटीआयआय विद्यार्थी संघटनेने आक्षेप घेत विरोध केला आहे. या संयुक्त कोर्सच्या प्रवेश परीक्षेसाठी १० हजार रुपये परीक्षा असून केवळ धनदांडगे किंवा ज्यांना १०००० रुपये भरता येतील, त्यांच्यासाठीच हा कोर्स असल्याचं विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अधित व्ही सत्विन यांनी म्हटलंय 

दरम्यान , दिल्लीतील जेएनयूमधील विद्यार्थीच्या म्हण्यानुसार , कॅगच्या अहवालानुसार २. १८ कोटी रुपयांचा फ़ंड शिक्षण व स्वच्छतेसाठी जमा केला आहे. त्याचा वापर न करता हा फंड असाच पडून आहे. हा फ़ंड विद्यापीठात शिकणाऱ्या गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीप , वसतिगृह विकास, पुनर्बांधणी, सफाई,  व खान कामगारांची मुले, त्याच्या शिक्षणासाठी वापरावा अशीही मागणी तेथील विद्यार्थ्यांनी केली होती. त्यामुळे पुण्यातील एफटीआयआयच्या विध्यार्त्यांनीही अशीच मागणी करत फी दरवाढीला विरोध केला आहे.