“ गोकुळ “ ठराव जमा करण्यास सुरुवात

0
91

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक  संघाच्या [ गोकुळ ] पंचवार्षिक निवणुकीसाठी ठराव जमा करण्याची प्रक्रिया  सोमवार [दि. २३ ] पासून सुरु झाली. पहिली दिवशी ३, ६५९ क्रियाशील दूध संस्थांपैकी फक्त एकाच संस्थेने ठराव जमा केला. फत्तेसिंग रामसिग भोसले- पाटील यांनी आपल्या नवे राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील हनुमान सहकारी दूध संस्थेचा ठराव स्वतः येऊन ताराबाई पार्कातील सहनिबंधक [ दुग्ध ] यांच्या कार्यालयात जमा केला. हा ठराव जमा करण्यासाठी महिन्याचा अवधी असल्याने जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून याला गती येणार आहे. 

गोकुळ दूध संघाची निवडणूक २३ एप्रिल पूर्वी होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरु आहे. गोकुळ व्यवस्थापनाने दिलेल्या ३,६५९ क्रियाशील दूध संस्थांना १६ ते २१ डिसेंबर पर्यंत ठरावाचा नमुना आणि पत्राची प्रत पोस्टाने पाठविली आहे. संस्थांकडून वैयक्तिक अथवा पक्षीय तसेच नेत्यांनी एकगठ्ठा जमा केलेले ठराव ताराबाई पार्क मधील कार्यालयात जमा करून घेतले जातील. दरम्यान, गोकुळ सत्ताधारी आणि विरोधी आघाडीचे नेते हिवाळी अधिवेशन व त्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अनुषंगाने व्यस्त आहेत. यामुळे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर ठराव जमा करण्याचे काम वेगाने होईल. 

सहकार विभागाने ३, ६९६ दूध संस्थांना १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत ठरावाची प्रत आणि नमुना पत्र पाठविले रजिस्टर पोस्टाने पोहोच केली. या संस्थांनी हिरव्या रंगाच्या ठरावाची प्रत आणि पत्र २३ डिसेंबर २०१९ ते २२ जानेवारी २०२० या महिन्यभरच्या कालावधीत जमा करता येईल. २३ जानेवारी नंतर ८ दिवसात ठरावाची छाननी प्रक्रिया होईल. ५ फेब्रुवारी २०२० पर्यंत प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. त्यानंतर दहा दिवस हरकती स्वीकारल्या जातील. यानंतर सुनावणी आणि त्यावर निर्णय प्रक्रिया पूर्ण होऊन १ मार्च २०२० पर्यंत अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे नियोजन सहकार विभागाने केले आहे. यानंतर २३ एप्रिल पूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवे संचालक मंडळ अस्तित्वात येईल. 

  • पंधरा दिवस संथ गती 

प्रारूप मतदार यादी कार्यक्रमासाठी सहनिबंधक करवीर [ दुग्ध] गजेंद्र देशमुख यांच्याकडे प्राधिकृत अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. जानेवारी नंतरच ठराव जमा करण्यासाठी गर्दी होणार असल्याने गोकुळ आणि सहकार विभागाचे कर्मचारी निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पाहणार आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून तसे आदेश देणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.