भरभराटीची संधी: नियोजनाचा अभाव

0
104

कोल्हापूर: कोल्हापूर आता अक्षरशः गर्दीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. विशेषतः आठवड्याच्या शेवटी तरी शहरात दुचाकी चालविणे मुश्किल व्हावे एवढी प्रचंड गर्दी असते. अंबाबाईला येणाऱ्या भाविकांच्या या गर्दीला शिस्त लावली नाही तर शहराची सारी व्यवस्था कोलमडून पडेल, अशी स्थिती आहे. या गर्दीचा धोका वेळीच ओळखून यंत्रणांनी सक्षम पणे जबाबदारी पार पाडली पाहिजे. 

आंबाबाईचे मंदिर हे जगप्रसिद्ध आहे . देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी, व अंबाबाईचरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. खरे तर होणारी भाविकांची गर्दी कोल्हापूरला काही ना काही तरी देऊनच जाते. यामुळे  होणारी आर्थिक उलाढाल मोठी आहे. अगदी वाहतूक व्यवस्थे पासून हॉटेल, खानावळी, लॉजिंग यांसह स्थानिक रिक्षा व अन्य वाहतूक व्यवस्था , खाद्यपदार्थच्या गाड्या यश अनेक व्यवस्थांना या भाविकांच्या गर्दीने चालना मिळते. 

पण , भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी असलेल्या या यंत्रणा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसातील गर्दीने समोर आणले आहे. ह्या सगळ्या गोष्टी भाविकांनी वाहने शहरात प्रवेश केल्यापासून सुरु होतो. नेहमीप्रमाणे अंबाबाईच्या मंदिरा जवळ विद्यापीठ हायस्कूलसमोर पार्किंग आहे. पण मोजक्याच मोटारी तिथे उभ्या राहतात. या ठिकाणी पार्किंग मिळणे मुश्किल असते. बिनखांबी गणपती मंदिरा पासून येणाऱ्या मोटारी मंदिरा कडे वळल्या कि, पार्किंग जागेकडे जाईपर्यंत पार्किंग उपलब्ध आहे कि नाही कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे मंदिराच्या पार्किंग पर्यंत गेलेली मोटार पुन्हा उलटी आणली जातात. तोपर्यंत मोटारीच्या मागे आणखी काही मोटार लागतात. आणि एकेक मागे घेईपर्यंत वाहनांची रांग कोटी शाळा आणि न्यू महाद्वार रोडला लागते. हे टाळायचे असेल, तर मंगलधामच्या कोपऱ्याला पार्किंग भरल्यानंतर निरोप देणारी यंत्रणा करणे शक्य आहे. , पण हे न केल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होते. 

येथून या मोटारीचा प्रवास पार्किंग बिंदू चौकाकडे वळविला जातो. मिरजकर तिकटीमार्गे बिंदू चौकाकडे गेल्यावर तेथेही पार्किंग बऱ्याच वेळेला भरलेले असते. विशेषतः नवरात्र, दिवाळी, वर्ष अखेर, नव्या वर्षची सुरुवात आणि दर आठवड्याचा शुक्रवार , शनिवार, रविवार थोड्या फार फरकाने अशीच परिस्थिती असते. या चौकात वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक शाखेचे पोलीस असतात. ते पार्किंग भरल्याचे सांगून पुढे जाण्यास सांगतात. पण नेमके कोणीकडे जायचं हे कोणीच सांगत नाही. त्यामुळे प्रत्येक चौकात पार्किंग कुठे मिळेल, याची चौकशी करीत थांबणाऱ्या मोटारी मुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. तसेच बसेस, टेम्पो ट्रक्स, हा सारा जथ्था दसरा चौक, पंचगंगा नदी या दिशेला वळतो. तेथून भाविकांना नेण्यासाठी ते बिंदू चौक आणि ताराबाई रोडवर येतात. तेथेही वाहतुकीची कोंडी होते. 

येणारे भाविक हि कोल्हापूरची संधी आहे. त्यामुळे शहरात उत्पन्नाचे स्रोत वाढल्याने अनेक रिकाम्या हातानं रोजगार मिळाला आहे. तो दिवसेंदिवस वाढत आहे पण गर्दी हि अनियंत्रित आहे. या गर्दीवर या कोणाचे नियंत्रण, नाही कोणचे मार्गदर्शन, त्यामुळे संपूर्ण शहरभर वाहतूक कोंडीचा फरक बसत आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातील अनेक जिल्ह्यातून दहा दहा बसेसच्या ताफ्यातून भाविक अंबाबाईच्या दर्शनाला येतात, तेव्हा तर संपूर्ण शहराची वाहतूकच विस्कळीत होते. तारांरानी चौकातून बिंदू चोकपर्यंत येणाऱ्या ताफ्यावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवता येत नाही. किंवा मार्गदर्शन केले जात नाही . 

हे सारे नियंत्रण करता येईल, त्याला शिस्त लावता येईल. येणारे भाविक हि कोल्हापूर साठी चांगली संधी आहे. रोजगार निर्माण करणारा आणि अनेक व्यवसायांना भरभराटी लाभणारा  भाविक वर्ग कोल्हापुरात येतोय, याकडे साऱ्या यंत्रणांनी एकत्रितपणे पाहण्याची गरज आहे. भाविकांच्या अनेक अडचणी आहेत. चांगली स्वच्छता गृहे, रस्ते, याना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणारी यंत्रणा, हि  सारी यंत्रणा योग्य नियंत्रण द्वारे निर्माण करता येईल. कोल्हापूरचा वारसा मोठा आहे, त्याचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. यंत्रणेला गतिमान केले पाहिजे. यातूनच कोल्हापूरला आणखीन भरभराटीचे दिवस येणार आहेत, पण त्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे.