मालवाहतूक वाहनांना मंदीमुळे ब्रेक

0
84
overloading-649x375

मालवाहतूक वाहनांना मंदीमुळे ब्रेक

कुपवाड: 

गेल्या काही वर्षांपासून उद्योगांवर जागतिक मंदी , नोटाबंदी, तसेच जीएसटी मुळे फार मोठे संकट आले आहे. त्यामुळे मालवाहतूक करणारे ट्रक, टेम्पोच्या चाकांना ब्रेक लागल्यामुळे मालक, चालक, कर्जबाजारी होऊन संकटांत सापडलेत. जागोजागी भाडे मिळेल अशा आशेने औद्योगिक वसाहती मध्ये ट्रक, टेम्पो थांबलेले आहेत. 

जागतिक मंदीमुळे कुपवाड, मिरज सांगली या औद्योगिक वसाहत मधील काही छोटे-मोठे उद्योग बंद पडलेत. तसेच काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. याचा परिणाम माल वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पो वर झाला असून या वाहनांची चाके थांबलेली आहेत. कुपवाड, सांगली , मिरज मध्ये अनेक कंपन्या आहेत. यांची आर्थिक मंदीने या उद्योगाची चाके थांबली आहेत. अनेक ट्रक, टेम्पो चालकांनी विविध बँका, फायनास , वित्तीय संस्थे कडून काढलेली कर्जाची हप्ते थकीत झाल्याने त्यांची वाहने जप्त केली जात आहेत किंवा ओढून नेली जात आहेत. त्यामुळे वाहन चालक -मालक कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत.

जागतिक मंदी , जीएसटी, नोटबंदी, मुळे औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखानदारांनी कामगार कपात केली आहे.  त्यामुळे उत्पादन क्षमता कमी झाली आहे. आणि याचा फटका वाहन, चालक, मालक याना बसला आहे. वाहन जैसे थे थांबली आहेत. दिवसेंदिवस डिझेलच्या दरात वाढ होता आहे. पण मालवाहतुकीच्या दरात मात्र काही वर्षात वाढ झालेली नाही. ट्रक मालकांनी मालवाहतूक दरात वाढ केल्यास उद्योजक दरवाढ परवडत नाही आणि दरवाढ देत नाहीत, ते संजय लोखंडे यांनी सांगितले. 

सध्या स्पर्धेचे युग असल्याने काही वाहन चालक , मालक मिळेल त्या दरात वाहतूक करीत आहेत. महाराष्टातून एखादा ट्रक दुसऱ्या राज्यात माल घेऊन गेल्यावर परत येताना मालाची ऑर्डर मिळावी म्हणून काही दिवस थांबवा लागते. त्याची उपासमार होते. त्याचबरोबर ट्रक चालक पोलीस, आर.टी . ओ . यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यातच शासनाने आता फास्टग चालू केले आहे. फास्टग हे वाहतुकीला उत्तम असले तरी त्यात अजूनही काही त्रुटी आहेत फास्टग बऱ्याच टोलनाक्यावर उपलब्ध नाही. त्यामुळे फास्टग होऊनही वाहन चालकांना टोलनाक्यावरील गर्दीला सामोरे जावे लागत आहे. 

अनेक वाहनचालकाकडे फास्टग आहे. पण ,टोलनाक्यावरील संगणकावर फास्टग दाखवत नाही त्यामुळे अनेकांना भुर्दंड भरावा लागत आहे. देशातील अनेक ट्रक मालक कर्जबाजारी होत असल्याने शेतकऱ्यासारखी त्यांनाही आत्महत्या करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाहनमालकाचा फायनान्स बँक, वित्तीय संस्थेने विचार कर्ज हप्त्याची सवलत द्यावी, अशी मागणी लोखंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.