बार बाउन्सरने केला गोळीबार : बिल देण्यावरून वाद

0
85
pune bar

पुणे : शहराच्या मध्य वस्तीत एका हॉटेल मध्ये  मद्यपान व जेवण केल्यानंतर बिल देण्यावरून हॉटेलमधील कर्मचारी आणि व्यवस्थापकांशी ग्राहकाने भांडणे केली. यावेळी वाद वाढल्याने हॉटेलमधील बाउन्सरने पिस्तुलातून हवेमध्ये गोळीबार केला. हि घटना मंगळवार पेठेतील हॉटेल वसंत येथे सोमवारी रात्री साडेअकरा वाजता घडली . पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या बाउन्सरसह आणखी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

महिमाशंकर तिवारी असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे . तर ग्राहक व हॉटेलमधील ९ कर्मचाऱ्याचा गुन्हा दाखल केलेल्या मध्ये समावेश आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रविकांत कदम यांनी समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मंगळवार पेठेतील हॉटेल वसंत बार येथे तीन ग्राहक आले होते. त्यांनी मद्यपान केले व नंतर जेवण केले . त्याचे बिल देण्यावरून त्यांचं वाद झाला. तेव्हा ग्राहकांनी हॉटेलमधीत टेबलची मोडतोड केली. त्यावरून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी या ग्राहकांना मारहाण केली. हॉटेलमधील सुरक्षेच्या नावाखाली ठेवलेल्या महिमाशंकर तिवारी या बाउन्सर तेथे आला. त्याने वादामध्ये मध्यस्थी करण्यास प्रयत्न केला पण त्याच्यातील वाद कमी होण्यापेक्षा आणखीनच वाढला. ते पाहून तिवारी याने आपल्याकडील पिस्तुलातून हवेत एक फायर केले. त्यामुळे त्यांच्यातील वाद थांबला. त्यांनी तिघा ग्राहकांना पकडून ठेवले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी हजार झाले. हॉटेल मधील सीसीटीव्ही फुटेज पाहून कोणाच्याही जीवितास धोका नसताना गोळीबार करून उपस्थितांची सुरक्षितता धोक्यात येईल अश्या रीतीने गोळीबार केला. तसेच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना मारहाण केली. ग्राहकांनी पण टेबल खुर्च्या, यांची मोडतोड केली यावरून पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे.