महागाई वाढणार?महसूल घटल्याने केंद्र सरकार जीएसटी वाढविण्याच्या विचारात

0
75
gst tax

महागाई वाढणार ? महसूल घटल्याने केंद्र सरकार जीएसटी वाढविण्याच्या विचारात 

आर्थिक मंदीमुळे महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे केंद्र आणि राज्यांना वर्षाला १३७५० कोटींचा तोटा झाला आहे. 

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने अडीच वर्षांपूर्वी जीएसटी कर प्रणाली लागू केली आहे. मात्र , महसूल घटल्याने जीएसटीच्या स्लॅबमध्ये वाढ करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास ५ टक्कयांवरून हि श्रेणी ९ ते १० टक्क्यावर , १२ टक्क्यावरून १८ टक्केवर करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला मोठा झटका बसणार आहे. 

१२ टक्के कराच्या श्रेणीमध्ये येणाऱ्या २४३ वस्तू १८ टक्केवर नेण्यात येणार आहेत. या करवाढीमुळे सरकारला १ लाख कोटीची अतिरिक्त महसूल प्राप्त होणार आहे. .त्याचबरोबर जीएसटी करातून वगळलेले काही वस्तूही पुन्हा करामध्ये आणण्यात येणार आहेत. राज्य सरकारांना देण्यात येणार परतावा हा अपेक्षे पेक्षा कमी झाला आहे. यामुळे हि वाढ करण्याचे सुचविण्यात आल्याचे काही राज्याच्या प्रतिनिधींनी सांगितले . 

जुलै २०१७ मध्ये अनेक वस्तूचा कर १४. ४ टक्क्यावरून ११. ६ टक्क्यावर आणण्यात आला होता. याचा फटका महसूलावर झाला .जवळपास वर्षाला २ लाख कोटींचा फटका बसला. महसूल दराशी  तुलना केल्यास हा फटका २. ५ लाख कोटीवर जाण्याची शक्यता माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमनियन यांनी सांगितले . 

आर्थिक मंदीमुळे महसुलावर मोठा परिमाण झाला आहे. यामुळे केंद्र आणि राज्यांना वर्षाला १३७५० कोटींचा तोटा झाला आहे. यामुळे केंद्र सरकारला जीएसटी स्लॅबमधे वाढ करणे गरजेचं बनलं आहे. हे करताना महागाईचा विचार करावा लागणार आहे. शून्य कराच्या   श्रेणीतील वस्तूंनाही हात लावता येणार नाही. कमी श्रेणीच्या करामध्ये वाढ करणे हे फायद्यचे ठरणार असून त्यामुळे महसुलात मोठी वाढ होईल, असे मत जीएसटीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले आहे. यामुळे ५ आणि १२ टक्क्यामध्ये येणाऱ्या वस्तूवरील कर वाढविण्याचा विचार करण्यात येत आहे.