हैद्राबाद एन्काऊंटर : ११ डिसेंबरला सुनावणी

0
66
encounter

हैद्राबाद एन्काऊंटर  : ११ डिसेंबरला सुनावणी 

नवी दिल्ली :  हैद्राबाद एन्काउंटरविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाने येत्या बुधवारी ११ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. हैद्राबाद पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपींचा केलेला एन्काउंटर फेक असल्याचा दावा करत अँड . जी एस मणी आणि अँड . प्रदीपकुमार यादव यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. 

तसेच हैद्राबाद येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या चार आरोपींची एन्काउंटरची चौकशी करावी तसेच संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशा विनंतीची आणखी एक याचिका अँड. एम. एल . शर्मा यांनी गेल्या शनिवारी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या दिशा- निर्देशाचे पालन पोलिसांचे केले नसल्याचा आक्षेप याचिकाकर्त्यांनी घेतला आहे. 

हैद्राबाद एन्काउंटर एकीकडे पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय, आणि दुसरीकडे काही राजकीय नेते, वकील व संघटनांनी या प्रकरणावरून हैद्राबाद पोलिसांना धारेवर धरले आहे. एन्काउंटरची न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, अशा आशयाची याचिका अँड . एम. एल. शर्मा यांनी दाखल केली आहे. 

पोलिसांचे समर्थन करणाऱ्या राज्य सभेच्या खासदार जया बच्चन तसेच दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती महिवाल यांच्या विरोधात कारवाई करण्याची विनंतीही शर्मा यांनी केली आहे. तर अँड . जी एस . मणी आणि अँड . प्रदीपकुमार यादव यांनी याचिका दाखल करत एन्काऊंटर प्रकरणात सामील असलेल्या पोलिसांच्या चॊकशीची तसेच विनंती केली आहे.